AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. Devendra Fadnavis interview with Raju Parulekar

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jun 23, 2020 | 3:24 PM
Share

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केलं. मनसे नेते राज ठाकरे यांच्याबद्दलच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिलं. (Devendra Fadnavis interview with Raju Parulekar)

शिवसेनेसोबतच्या काडीमोडानंतर फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांनी मनसेचा झेंडा बदलला. तर त्या भेटीत यामागील काही रहस्य होतं का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला.

त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे यांना आपण जवळून ओळखता. कुणाच्या म्हणण्याने ते काही करतील असं नाही. राज ठाकरे यांना त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती समजते. कुठे पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कशी भरुन काढायची हे समजतं. ते कुणाच्या सांगण्यावरुन काही करतील असं वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

शिवसेना मोठी कधी झाली? शिवसेनेने मराठी माणसासोबत हिंदुत्वाची कास धरली, तेव्हा राष्ट्रीय पक्ष झाला. राज ठाकरेंच्याही लक्षात आलं की मराठी माणूस हा केंद्रबिंदू असलाच पाहिजे, पण त्याला व्यापकता दिली नाही तर, आपली भूमिका मर्यादित राहते.

राज ठाकरे हे माझे मित्र आहेत, मीडियाला न समजता आम्ही अनेकवेळा बोललोय, भेटलोय. मी मुख्यमंत्री असतानाही त्यांना भेटलोय. राज ठाकरेंशी गप्पा मारायला मजा येते. त्यांच्याकडे वेगळी माहिती, वेगळं नॉलेज असतं. मी त्यांच्यावर खूप टीका केलीय, त्यांनी माझ्यावर केलीय. एकमेकांची उणीदुणी काढली आहेत.

पण त्यांच्याकडे वेगळा विचार आहे, त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची पद्धत आहे. माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे आले नाहीत, ते हिंदुत्वाकडे येत आहेत असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून समजून घेतलं की नेमकं त्यांच्या मनात काय आहे, त्यांचा ट्रॅक करेक्ट होता, ते योग्य दिशेने होते.

जेव्हा मनसे काढली तेव्हाच त्यांनी भगवा झेंडा ठरवला होता, पण काही कारणांनी आधीचा झेंडा आणला. पण भगवा आधीच रजिस्टर करुन घेतला होता. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाकडे जाण्याने माझा त्यांच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढलाय, असं फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंसोबत दोन गोष्टीत पटू शकतं

राज ठाकरेंसोबत आमचं दोन गोष्टीत पटू शकतं. मराठी माणसाचा त्यांचा आग्रह मला मान्य. हिंदुत्व शंभर टक्के मान्य. फक्त एक गोष्ट आम्हाला मान्य होऊ शकणार नाही, ते म्हणजे परप्रांतियांसंबंधात, गैर मराठी लोकांसंबंधात अतिशय टोकाची भूमिका नको. आता त्यांची भूमिका फार टोकाची वाटत नाहीय. थोडी व्यापक होत आहे. पण परप्रांतियांबाबत ते जी भूमिका घेत आले आहेत, त्यामध्ये त्यांचं आणि आमचं जमणं शक्य नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालायचं आहे. मराठी माणूस हा महत्त्वाचा आहेच, महाराष्ट्रात त्याला महत्त्व मिळालंच पाहिजे, पण गैरमराठींचा तिरस्कार नको. याबाबत आमची मतं जुळत नाहीत, तोपर्यंत राजकीय प्रेमप्रकरण होणं कठीण आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजकीय शक्यता वाढलीय का? हे राज ठाकरेच सांगू शकतील. राज ठाकरेंसोबत गेलं पाहिजे हे आमच्या मनात होतं, पण एका कारणाने तत्वावर आम्ही गेलो नाही. व्यक्ती म्हणून वैर नाही, जुने मित्रच आहेत. हिंदुत्व आणि मराठी माणूस यावर वादच होत नाही. पण परप्रांतियांबाबतची भूमिका बदल नाही, याचा अर्थ परप्रांतियांनी येऊन आमच्या डोक्यावर बसावं असं आमचं मत नाही, परंतु टोकाची भूमिका नको, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या  

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या युतीचे संकेत

मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलल्यास युती शक्य, राज यांच्या भेटीनंतर फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य

(Devendra Fadnavis interview with Raju Parulekar)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.