Chandrasekhar Bawankule | तुम्ही झोपा काढता का? ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्य सरकारला फटकारले

| Updated on: Jun 14, 2022 | 3:54 PM

सुप्रीम कोर्टनं राज्य सरकारला डेटा कसा करायचा. कोणी करायचा, ते सगळं सांगितलं आहे. पण त्यांना फक्त टाईमपास करायचं आहे, अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली.

Chandrasekhar Bawankule | तुम्ही झोपा काढता का? ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्य सरकारला फटकारले
चंद्रशेखर बावनकुळे
Follow us on

नागपूर : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षण आणि महागड्या वीज बिलावरून राज्य सरकारला फटकारले. चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी आरक्षणाबद्दल म्हणाले, मी सुरुवातीपासून सांगतो आहे. या सरकारने जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षणासाठी तीन वर्षे टाईमपास केला. आणि आताही टाईमपास (Timepass) करत आहे. काल विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी कबूल केलं की, डेटा चुकीच्या पद्धतीने होत आहे. सरकार तुमच्याकडे आहे. मग तुम्ही झोपा काढता का? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते म्हणाले, एकीकडे आयोगाला (Commission) चुकवायला सांगतात. टाईमपास करायला सांगतात. महाराष्ट्रात दौरा करायला सांगतात. दौरा करायची गरजच नाही. आता आडनावाप्रमाणे डेटा (Data) काढत आहे. यावर जर कोणी सांगितलं की, मी या आडनावाचा आहे. पण या जातीचा नाही तर तो डेटा खराब होईल. डेटा तयार करण्याची पद्धत चूक आहे.

सरकार म्हणून काय करता?

सुप्रीम कोर्टामध्ये हे सरकार तोंडावर पडेल. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडाव्यात, असा या सरकारचा मनसुबा आहे. विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ काल मीडियामध्ये बोलले. देवेंद्र फडणवीस म्हणतात ते बरोबर आहे. मग तुम्ही सरकार म्हणून काय करता, असा माझा प्रश्न आहे. चूक दुरुस्त करा आणि आठ दिवसात डेटा द्या असं या मंत्र्यांनी म्हटलं पाहिजे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सुप्रीम कोर्टनं राज्य सरकारला डेटा कसा करायचा. कोणी करायचा, ते सगळं सांगितलं आहे. पण त्यांना फक्त टाईमपास करायचं आहे, अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली.

महागडी वीज खरेदी, जनतेकडून वसुली

वीज बिल वाढीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महावितरणने काही सेक्टरमध्ये पाच ते पंचवीस पैसेपर्यंतचे दरवाढ केली आहे. ही वाढ चुकीच्या पद्धतीने केली आहे. कारण मार्च-एप्रिल-मेमध्ये स्वस्त कोळसा वापरून वीज तयार करायला पाहिजे होती, म्हणजे लोकांना याचा भुर्दंड लागला नसता. यांच्या प्रशासकीय चुका आणि वाढीव दराने घेतलेली वीज याचा जनतेला फटका बसला आहे. महागडी वीज खरेदी करावी लागली. त्याचे पैसे आता जनतेकडून वसूल करत आहेत. हे चुकीचा आहे. त्यामुळे इंधन आकाराचे पैसे या सरकारने भरावे कारण ही जनतेची चूक नाही यांची चूक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा