Maharashtra politics : …तर झेंडे काढून दांडे हातात घेऊ; मराठा क्रांती मोर्चाचा शिवसेनेला इशारा

| Updated on: Jun 26, 2022 | 12:02 PM

राज्यात गेल्या आठवडाभरापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता यामध्ये मराठा क्रांती मोर्चाने देखील उडी घेतली आहे. मराठा नेत्यांना टार्गेट करू नका, नाहीतर झेंडे काढून दांडे हातात घेऊ असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.

Maharashtra politics : ...तर झेंडे काढून दांडे हातात घेऊ; मराठा क्रांती मोर्चाचा शिवसेनेला इशारा
Follow us on

मुंबई : राज्यात गेल्या आठवडाभरापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. सरकार कधीही कोसळू शकते असे चित्र आहे. यामुळे राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, राज्यभरात आंदोलन सुरू आहे. जे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झाले आहेत, त्या आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. आता या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha) देखील उडी घेतली आहे. मराठा नेत्यांना टार्गेट करू नका, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड कराल तर झेंडे काढून दांडे हातात घेऊ असा इशारा  मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील (Abasaheb Patil) यांनी दिला आहे. बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

काय म्हणाले आबासाहेब पाटील?

यावेळी बोलताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, कोणीही मराठा समाजातील नेत्यांना टार्गेट करू नये. आम्ही एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. ही तोडफोड थांबवण्यात यावी. अन्यथा आम्ही देखील झेंडे काढून दांडे हातात घेऊ, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसैनिकांकडून ज्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे, त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनदरम्यान एक-दोन ठिकाणी कार्यालय तोडफोडीच्या घटना देखील घडल्या आहेत. दुसरीकडे काही बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसैनिकांकडून विरोध सुरूच

दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांचा निषेध सुरूच आहे. आज वसई विरारमध्ये बाईक  रॅली काढत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली तर बंडखोर आमदारांचा निषेध केला आहे. तर पुण्याच्या येरवड्यामध्ये शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आहे. भिवंडीच्या ग्रामीण भागात देखील शिवसैनिकांचे आंदोलन सुरू असून, शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. शिवसैनिकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.