भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, अतुल भोसलेच ठरले सक्सेसफुल…!

| Updated on: Jul 02, 2021 | 7:45 AM

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई, भाजप नेते डॉ. अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. (DR Atul Bhosale Sahakar Panel Won krishna Sugar Mill Election Karad 2021)

भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल, अतुल भोसलेच ठरले सक्सेसफुल...!
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसलेंच्या (DR Atul Bhosale) सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे.
Follow us on

सातारा : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Krishna Sugar Mill Election Karad 2021) महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई, भाजप नेते डॉ. अतुल भोसलेंच्या (DR Atul Bhosale) सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांना या निवडणुकीत आस्मान दाखवलं आहे. (DR Atul Bhosale Sahakar Panel Won Krishna Sugar Mill Election Karad 2021)

दोन्ही काँग्रेस नेत्यांचे मनसुबे कृष्णेच्या सभासदांनी उधळले

भाजपाच्या डॉ. अतुल भोसलेंकडून कारखान्याची सत्ता हस्तग करण्यात दोन्ही काँग्रेस नेत्यांचे मनसुबे कृष्णेच्या सभासदांनी उधळले असून सहकार संस्थेत राजकारण आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न, निवडणुकीत शेतकरी, शेती, कारखान्यासंबंधी विरोधकांकडे प्रभावी मुद्दा नसल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे, अशा प्रतिक्रिया सभासद व्यक्त करत आहेत.

निवडणुकीचा निकाल जाहीर, सर्वच्या सर्व जागी भोसलेंच्या पॅनेलचा डंका

कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा मतमोजणीचा निकाल जाहीर झाला असून डॉ अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलनी सर्व 21 जागावर दहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला होता. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. अखेर अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांना चारीमुंड्या चित केलं.

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचा दणदणीत विजय

सातारा सांगली जिल्ह्यात 47145 सभासद असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दणदणीत विजयी मिळवला.

आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त मताधिक्य

या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. या कारखान्याची सत्ता भोसले गटाकडून दुसरीकडं जावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधक एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि राज्यमंत्री विश्वजित कदम नेतृत्व करत असलेले रयत पॅनेल अशी आणखी दोन पॅनल रिंगणात आल्याने या निवडणुकीची चर्चा खूप झाली. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते.

दिग्गजांची विधानसभा क्षेत्र, अनेकांची रणनिती, पण अतुल भोसले सगळ्यांना पुरुन उरले

मतदानही विक्रमी झाले, दिग्गजांचे विधानसभा मतदार संघ या कार्यक्षेत्रात येत असल्याने सगळ्याच नेत्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लक्ष होते. मात्र भोसले गटाने मोठ्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत कृष्णाची सत्ता पुन्हा एकदा मिळवल्याने आता विरोधकांची चिंता वाढली आहे. या निवडणुकीचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवर पडणार हे निश्चित आहे.

सहकारी संस्थेत राजकारण बाजूला ठेवा

ही निवडणुक ऐतिहासिक झाली असून सभासदांनी दिलेल्या मोठ्या मताधिक्‍यामुळे जबाबदारी वाढली असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे. या निवडणुकीत अनेक राजकारणी उतरले होते. सहकारी संस्थेत राजकारण बाजूला ठेवण्याचा संदेश या निवडणुकीने दिले दिला असल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी सहकार पॅनलचे प्रमुख व चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली

विजयानंतर अतुल भोसलेंची प्रतिक्रिया

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त कृष्णा सहकारी साखर कारखाना राजकारणाचा अड्डा बनवण्याचे षडयंत्र अनेक राजकारण्यांचं होतं मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर डॉ अतुल भोसले यांनी दिली.

सभासदांचा पुन्हा डॉ. सुरेश भोसलेंना कौल

कृष्णा कारखान्याचा निकाल व सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांना मिळालेले उच्चांकी मताधिक्य ही काळाची पाऊलं ओळखून सहकारी संस्था व्यवसायिकदृष्टया चालवून शेतकऱ्यांना फायद्यात ठेवणाऱ्या डॉ. सुरेश भोसलेंसारख्या नेतृत्वाला शेतकरी सभासदांनी दिलेला कौल असल्याची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात आहे.

(DR Atul Bhosale Sahakar Panel Won krishna Sugar Mill Election Karad 2021)

संबंधित बातम्या  

Exit Poll : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कुणाला किती जागा?

कृष्णा सहकारी कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीत ट्विस्ट, विश्वजीत कदमांचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा 

कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा चर्चेतून काढता पाय