कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा चर्चेतून काढता पाय

कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाण्याची निवडणूक आता तिरंगी होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण सत्ताधारी पॅनलविरोधात एकत्र आघाडी तयार करण्याचे प्रयत्न फळाला येत नसल्याचं दिसतंय. (Satara Karad Yeshwantrao Mohite Krishna Sugar Mill Election)

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा चर्चेतून काढता पाय
पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 8:38 AM

सातारा : कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाण्याची (Krishna Sugar Mill Election) निवडणूक आता तिरंगी होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण सत्ताधारी पॅनलविरोधात एकत्र आघाडी तयार करण्याचे प्रयत्न फळाला येत नसल्याचं दिसतं आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात आघाडी तयार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रयत्न केले होते पण त्या मनोमिलनाच्या चर्चेतून बाहेर पडत असल्याचं चव्हाणांनी जाहीर केलं आहे. त्यामुळेच आता लक्ष होणाऱ्या तिरंगी लढतीकडे लागलं आहे. (Satara Karad Yeshwantrao Mohite Krishna Sugar Mill Election)

कुणाविरोधात कोण लढतंय?

पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनल हे सत्ताधारी आहे. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ.अतुल भोसले यांनी अर्जही दाखल केला आहे. सत्ताधारी पॅनलच्याविरोधात एक आघाडी तयार करावी यासाठी प्रयत्न केले गेले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि दुसरे माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांना एकत्र आणण्यासाठी हालचाली केल्या. सहकारी राज्यमंत्री विश्वजीत कदमही या प्रकियेत होते. पण दोन्ही माजी चेअरमनना एकत्र आणण्यात यश आल्याचं दिसत नाही. त्यातच आता खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी ह्या मनोमिलनाच्या चर्चेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं आहे. आता सभासदच निर्णय घेतील असं चव्हाण म्हणालेत.

का महत्वाची आहे कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक?

हा कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा कारखाना म्हणून ओळखला जातो. त्याचं कार्यक्षेत्र सातारा, सांगली अशा दोन जिल्ह्यात आहे. 47 हजार 700 एवढी सभासद संख्या आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजेच 29 जूनला निवडणूक होते आहे. तर निकाल हा 1 जुलै रोजी लागेल. कारखाना मोठा आणि सभासद संख्याही मोठी असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातल्या राजकारणावर ह्या निकालाचे परिणाम होणार हे निश्चित. राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाकडून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशानं घेण्यात येत आहे. सातारा, सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे.

तिरंगी लढत कशी होणार?

मनोमिलनाचे प्रयत्न आता थांबल्यात जमा आहेत. त्यामुळे तिरंगी लढत निश्चित मानली जाते आहे. डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतूल भोसले यांनी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांच्याविरोधात कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांच्या संस्थापक पॅनल आणि इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलचे आव्हान असेल.

(Satara Karad Yeshwantrao Mohite Krishna Sugar Mill Election)

हे ही वाचा :

कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?

मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.