कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरु, 4 वाजेपर्यंत निकाल, कुणाच्या अंगावर गुलाल?

पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील सातारा-सांगली जिल्ह्यांवर प्रभाव टाकणाऱ्या कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची (Krishna Sugar Mill Election) निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. (Krishna Sugar Mill Election Karad 2021 Start Counting of votes)

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सुरु, 4 वाजेपर्यंत निकाल, कुणाच्या अंगावर गुलाल?
कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रशासकिय कार्यालय
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 11:40 AM

सातारा : पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातील सातारा-सांगली जिल्ह्यांवर प्रभाव टाकणाऱ्या कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची (Krishna Sugar Mill Election) निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. सकाळी 9 च्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली असून कराड येथील वखार महामंडळाच्या गोदामात 74 टेबलवर 300 कर्मचाऱ्यांद्वारे मतमोजणी सुरु आहे. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास निकाल अपेक्षित आहे. निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कोण गुलाल उधळणार, हे स्पष्ट होईल. (Krishna Sugar Mill Election Karad 2021 Start Counting of votes)

पहिल्या फेरीतील मतमोजणी सुरु, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना धक्का

पहिली फेरीत जयवंतराव भोसले सहकार पॅनल आघाडीवर आहे. राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना धक्का मानला जातोय.  विश्वजीत कदम नेतृत्व करत असलेलं रयत पॅनेल पहिल्या फेरीअंती तिसऱ्या क्रमांकावर आहे.

संध्याकाळी 4 च्या सुमारास निकाल, मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त

मतपत्रिका एकत्र न करता मतदान केंद्रानिहाय मतमोजणी सुरु असून कृष्णा कारखाना निवडणुकीसाठी 47145 सभासदांपैकी 34532 सभासदांनी मतदान केले आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित आहे, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी दिली आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या तिरंगी निवडणुकीच्या निकालाकडे कारखाना सभासदांसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. पोलिसांनी मतमोजणी केंद्रासह परिसरात कडक बंदोबस्त लावला असून तपासणी करुनच मतमोजणीसाठी संबंधितांना आतमध्ये सोडले जात आहे.

हयात मतदारांपैकी तब्बल 91 टक्के मतदारांनी बजावला मतदानाचा अधिकार

कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मंगळवारी 29 जून पार पडली. या निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. एकूण 73.25 टक्के मतदारांनी मतदान केलं. मात्र, यादीतील एकूण 47 हजार 145 मतदारापैकी जवळपास 9 हजार हयात नाहीत. त्यामुळे हयात मतदारांपैकी तब्बल 91 टक्के मतदारांनी मतदान केलंय.

सत्ता कोण राखणार?

या निवडणुकीत एकूण 47145 मतदारांपैकी सुमारे 34532 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज गुरुवारी (1 जुलै) मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे. मात्र, त्याआधी ‘द स्ट्रेलेमा’ या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सत्ता सहकार पॅनल राखणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

(Krishna Sugar Mill Election Karad 2021 Start Counting of votes)

संबंधित बातम्या  

Exit Poll : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कुणाला किती जागा?

कृष्णा सहकारी कारखान्याच्या तिरंगी निवडणुकीत ट्विस्ट, विश्वजीत कदमांचा ‘या’ पॅनेलला पाठिंबा 

कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?

कराडच्या कृष्णा सहकारी कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा चर्चेतून काढता पाय

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.