Editor of saamana : इंधन दरवाढीचे तेल महागाईच्या वणव्यात ओतले, ‘सामना’तून पुन्हा केंद्रावर निशाणा, ‘गरज सरो, वैद्य मरो’ म्हणत धोरणांवर टीका

| Updated on: Mar 24, 2022 | 7:19 AM

केंद्र आणि राज्य सरकारमधील द्वंद सर्वश्रुत आहे. त्यातच शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून केंद्रावर वारंवार निशाणा साधला जातो. यावेळीही इंधन दरवाढीवरुन शिवसेनेनं केंद्र सरकार आणि त्यांच्या धोरणांवर बोट ठेवलंय. तर पाच राज्यातील निवडणुकांचा संदर्भ देत 'गरज सरो, वैद्य मरो' असं म्हणून इंधन दरवाढीचे तेल महागाईच्या वणव्यात ओतल्याचं म्हणत खरमरीत टीका केंद्र सरकारवर केली आहे.

Editor of saamana : इंधन दरवाढीचे तेल महागाईच्या वणव्यात ओतले, सामनातून पुन्हा केंद्रावर निशाणा, गरज सरो, वैद्य मरो म्हणत धोरणांवर टीका
संजय राऊत, नरेंद्र मोदी
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या चार राज्यांतील (5 State Elections 2022) विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला आहे. यानंतर ‘गरज सरो, वैद्य मरो’ असं धोरण केंद्रानं अवलंबल्याचं म्हणत दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून (Editor of saamana) केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारमधील द्वंद सर्वश्रुत आहे. त्यातच शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्रावर वारंवार निशाणा साधला जातो. यावेळीही इंधन दरवाढीवरुन शिवसेनेनं (shivasena) केंद्र सरकार आणि त्यांच्या धोरणांवर बोट ठेवलंय. तर पाच राज्यातील निवडणुकांचा संदर्भ देत ‘गरज सरो, वैद्य मरो’ असं म्हणून इंधन दरवाढीचे तेल महागाईच्या वणव्यात ओतल्याचं म्हणत खरमरीत टीका शिवसेनेनं केंद्र सरकारवर केली आहे. यावेळी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात इंधनाचे दर सांगून महागाईवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

‘गरज सरो, वैद्य मरो’

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात इंधन दरवाढीवरुन केंद्रावर निशाणा साधत म्हटलंय की, ‘पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ केंद्र सरकार रोखून धरेल आणि निकाल लागले की, या दरवाढीचा बुलडोझर सामान्य जनतेवर बिनदिक्कतपणे फिरविला जाईल, अशी भीती व्यक्त होत होतीच. ती अखेर खरी ठरली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या घरगुती गॅसचे सिलिंडर थेट 50 रुपयांनी महाग करण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे पेट्रोल पुन्हा शंभरीच्या पुढे, तर घरगुती गॅस सिलिंडर एक हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी तर तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागणार आहे.’

‘भाव वाढून मखलाशीही’

केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे खाक्या दाखविल्याचंही दैनिक ‘सामना’मध्ये इंधन दरवाढीवरुन म्हटलंय, ‘हिजाब, पाकिस्तान, हिंदू-मुसलमान असा भावभावनांचा कल्लोळ करुन मोदी सरकार, भाजप आणि अंध भक्तांनी सामान्य जनतेचे कान आणि मन जणू व्यापून टाकले होते. आता निवडणुका संपल्याने मोदी सरकारने नेहमीच्या खाक्या दाखविल्या आहे. अर्थात, एवढे करुनही 6 ऑक्टोबर 2021 नंतर पहिल्यांदा गॅस दरवाढ केल्याचा आव हे आणतील जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकूनही मागील 137 दिवस आम्ही इंधन दरवाढ रोखून सामान्य जनतेवर उपकारच केले, अशी मखलाशीही करतील.’

इंधन दरवाढीचे पाप दुसऱ्यांच्या माथी

इंधन दरवाढीचे पाप केंद्र सरकार युक्रेन आणि रशियाच्या माथी मारु शकते, असंही दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलंय. ‘रशिया युद्ध आणि त्यामुळे जागतिक बाजारात उडालेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका आमच्या नियंत्रणात नाही, असे सांगून इंधन दरवाढीचे पाप केंद्र सरकार रशिया आणि युक्रेनच्या माधी मारू शकते.’ असं म्हणत दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्रावर इंधन दरवाढीवरुन टीकास्त्र सोडण्यात आलंय.

इतर बातम्या

नाशिकचे नवे जिल्हाधिकारी आक्रमक; औषध विक्रेत्यांना सीसीटीव्ही लावणे केले अनिवार्य, का दिले आदेश?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढणार; हवामान बदलाची ‘ही’ कृपा दिसणार

Toor Crop : नोंदणी खरेदी केंद्रावर अन् तुरीची विक्री खुल्या बाजारात, शेतकऱ्यांच्या निर्यणायामागे कारण काय?