AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसेंचा भाजपला सोपा प्रश्न, ‘उत्तर दिलं तरी चालेल, न दिलं तरी चालेल’

"एकनाथ खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. आतापर्यंत पक्षाचं खूप ऐकलं. स्वत:च्या राजकारणासाठी स्वार्थी राजकारण करत आहेत. त्याचे परिणाम भोगावे लागतील", असा इशारा खडसे समर्थकांनी दिला. 

एकनाथ खडसेंचा भाजपला सोपा प्रश्न, 'उत्तर दिलं तरी चालेल, न दिलं तरी चालेल'
| Updated on: Oct 03, 2019 | 3:38 PM
Share

जळगाव :  भाजपच्या पहिल्या दोन्ही उमेदवार याद्यांमध्ये नाव नसल्याने दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse BJP) नाराज आहेत. एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse BJP) आधीच आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र पक्षाने अद्याप त्यांना उमेदवारीच दिली नाही. त्यांच्याऐवजी खडसेंच्या मुलीला तिकीट देण्याची भाजपची तयारी आहे. पण एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

“एकनाथ खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. आतापर्यंत पक्षाचं खूप ऐकलं. स्वत:च्या राजकारणासाठी स्वार्थी राजकारण करत आहेत. त्याचे परिणाम भोगावे लागतील”, असा इशारा खडसे समर्थकांनी दिला.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

तुम्ही 3 दिवसांपासून इथे आहात. आपण सर्वजण भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आपण पक्षाच्या आदेशाचे नेहमीच पालन करत आलो आहे. मला स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं, तेव्हा एका मिनिटात राजीनामा दिला. पक्षाने मंत्रिपद दिलं, पक्षाने आदेश दिला मंत्रिपद सोडलं. त्यामुळे आपल्या भावना स्वाभाविक आहे. गेली 30 वर्ष तुम्ही मला निवडून देत आहात. भाजपचं अस्तित्व इथे नव्हतंच, अशा परिस्थितीत तुमच्या सहकार्याने पक्ष वाढला.

एखादा विषय आपल्या आकलनाच्या पलिकडचा असतो. पक्षाने मला सांगितलं तुम्हाला तिकीट देणार नाही, तुमच्याऐवजी कुणाला द्यायचं हे तुम्ही सांगा. त्यावर मी सांगितलं की आपण काही सांगू शकणार नाही, कारण माझे सारे कार्यकर्ते हे एकनाथ खडसे आहेत.  मी का नको या सोप्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर माझं समाधान होईल, नाही उत्तर दिलं तरी चालेल. मी काही इतका मोठा माणूस नाही की पक्षाला काही विचारू शकेन.  जो काही पक्ष निर्णय घेईल, तो आपण मान्य करु. शांतता ठेवा. असं एकनाथ खडसे म्हणाले.

खडसेंची पत्रकार परिषद सुरु होती त्याचवेळी एक कार्यकर्ता अंगावर रॉकेल ओतून घेत होता. त्यावेळी खडसेंनी फोन लावून त्याला टोकाचा निर्णय न घेण्याचं आवाहन केलं.

दोन्ही याद्यांमध्ये खडसेंचं नाव नाही

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपच्या दुसऱ्या यादीतही तिकीट मिळालं नाही. त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Eknath Khadse) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतरही खडसे (Rohini Eknath Khadse) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कालपासून रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

दरम्यान, एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येणार आहे. भाजपची आणखी एक यादी येणार आहे त्यात नाव येण्याची शक्यता, भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

यंदा महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly election 2019) निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरला आहे. भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून 2 विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या 

खडसेंचा पत्ता जवळपास कट, मुलीला तिकीट देणार?  

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.