Eknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चार दिवसानंतरही जळगाव भाजप कार्यालयात खडसेंचा फोटो

एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करुन चार दिवस पूर्ण झाल्यानतंरही त्यांचा फोटो हटवण्यात आलेला नाही. (Eknath Khadse Photo not removed from Jalgaon BJP office)

Eknath Khadse | राष्ट्रवादी प्रवेशाच्या चार दिवसानंतरही जळगाव भाजप कार्यालयात खडसेंचा फोटो

जळगाव- ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपचा राजीनामा देवून आता राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. एकीकडे खडसे व भाजप नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या असतानाच, दुसरीकडे भाजप कार्यालयात मात्र, खडसे यांची प्रतिमा अद्याप कायम असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आहे. (Eknath Khadse Photo not removed from Jalgaon BJP office)

भाजपचे जळगाव जिल्हा कार्यालय अर्थात वंसत स्मृती जळगावातील बळीराम पेठेत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर हे कार्यालय चर्चेत आले आहे. कारण या कार्यालयात मुख्य प्रवेशद्वारजवळ असलेल्या जिल्हाध्यक्षांचा कार्यकाळ दर्शविणाऱ्या नाम फलकाजवळ खडसेंची प्रतिमा आहे.
खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करुन चार दिवस पूर्ण झाल्यानतंरही त्यांचा फोटो हटवण्यात आलेला नाही.

आज कोअर कमेटी बैठकीच्या निमित्ताने या कार्यालयात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यासह वरिष्ठ नेते व पदाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी काही नेत्यांचे लक्ष या प्रतिमेकडे गेले. त्यानतंर या विषयवरुन नेत्यांमध्ये कुजबूज सुरु झाली.मात्र, ती प्रतिमा काढेल कोण ? किंव स्पष्टपणे कोण बोलणार ? असा प्रश्न निर्माण झाला. यानंतर एकेका पदाधिकाऱ्याने काहीही न बोलता कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यामुळे आजही खडसे यांचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला आदरयुक्त दरारा अधोरेखित झाला आहे.

दरम्यान, या प्रकरासंदर्भात पत्रकारांनी गिरीश महाजन यांना छेडले असता, महाजन यांनी सांगितले की, खडसे यांनी पक्ष सोडलाय त्यामुळे आता ही प्रतिमा हटविण्यात येईल, असे स्पष्ट करुन महाजन देखील कार्यालयातून निघून गेले.भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काही एक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो. एकनाथ खडसे गेल्याने भाजपला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजप खासदार रक्षा खडसे या बैठकीला अनुपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर  गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले, रक्षा खडसे काल रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्व कल्पना देखील दिली होती. पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत संदर्भात तर्कवितर्क लढवणे चुकीचे असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

खडसेंच्या पक्षांतरानंतर गिरीश महाजन अ‍ॅक्टिव्ह, रक्षा खडसेंच्या गैरहजेरीवर पहिली कमेंट

जळगावात भाजपची बैठक, एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे गैरहजर

(Eknath Khadse Photo not removed from Jalgaon BJP office)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI