जळगावात भाजपची बैठक, एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे गैरहजर

जळगावातील भाजप बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती आहे. (MP Raksha Khadse absent at BJP meeting in Jalgaon)

जळगावात भाजपची बैठक, एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर पहिल्याच बैठकीला रक्षा खडसे गैरहजर
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 2:30 PM

जळगाव- एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती आहे. (MP Raksha Khadse absent at BJP meeting in Jalgaon)

भाजपच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी माजी मंत्री गिरीश महाजन, प्रांत संघटन मंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील आदी नेते उपस्थित आहेत.

भाजपच्या या तातडीच्या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पक्षसंघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक होत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या मूळगावी कोथळी येथे आल्यानंतर रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते.

एकनाथ खडसे यांना भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपची पहिलीच बैठक होत आहे. खडसेंनी जळगावमध्ये परतल्यानंतर बैठका घ्यायला सुरूवात करुन अ‌ॅक्शन मोडमध्ये असल्याचे दाखवून दिले होते. गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असणाऱ्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या ताकदीला रोखण्यासाठी भाजप काय करते हे पाहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Raksha Khadse | एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर खासदार सूनबाई रक्षा खडसे म्हणतात…

Raksha Khadse | एकनाथ खडसेंचा राजीनामा व्यक्तिगत कारणांमुळे, मी भाजप सोडणार नाही : रक्षा खडसे

(MP Raksha Khadse absent at BJP meeting in Jalgaon)

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.