मला ठाण्याला दाखवायची गरज नाही पण महाजनांना बुधवार पेठेत दाखवा-एकनाथ खडसे

मला ठाण्याला दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना लावल्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एका एकदा चर्चेला उधाण आले आहे.

मला ठाण्याला दाखवायची गरज नाही पण महाजनांना बुधवार पेठेत दाखवा-एकनाथ खडसे
गिरीश महाजन- एकनाथ खडसे वादाचा दुसरा एपिसोड
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 7:04 PM

जळगाव : एकानाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं राजकीय वैर आजपर्यंत कुणालाही दडलं नाही, आता गिरीश महाजन यांना कोरोना झाल्यानंतर खडसेंनी महाजनांना मोक्का लागण्याच्या भितीने कोरोना झाला का हे बघा, अशी कोपरखिळी मारली होती, त्यावरून आता पुन्हा वार-पलटवार सुरू झाले आहेत. मला ठाण्याला वेड्याच्या रुग्णालयात दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवा

गेल्या काही महिन्यांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. मला ठाण्याला दाखवायची गरज नाही मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला पाहिजे असा खोचक टोला एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना लावल्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एका एकदा चर्चेला उधाण आले आहे, खडसेंच्या मोक्का लावण्याच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी काही वृत्तपत्राशी फोनवर बोलताना खडसे यांच्या र टीका करताना खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते. गिरीश महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी पुन्हा आज उत्तर दिले आहे. आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला अॅडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवायला हवे, असा घणाघात केलाय.

जळगावात पोलिसांचं धाडसत्र

कोथरूडमधील एका गुन्ह्याप्रकरणी आज पुणे पोलिसांकडून जळगाव शहरात छापे मारी केली जात आहे. मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपींकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी हे छापे घातले गेले असू शकतील असा अंदाज बांधला जातोय. काल मोक्काच्या भीतीने गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे आपण म्हटले होते आणि आज छापे मारी सुरू झाली आहे, असे विचारले असता, हा केवळ योगा योग आहे अशा प्रकारची प्रतिक्रया एकनाथ खडसे यांनी आज दिली आहे.

Narendra Modi : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमी पंतप्रधान मोदींची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक, देशातील स्थितीवर मंथन

कुऱ्हाडीने वार करून कर्मचाऱ्याची हत्या, गोंदियातल्या आश्रमशाळेत घडलं काय?

‘होय! अंगावरचं दूध पाजताना त्रास झाला’, करीनापासून लारा दत्तापर्यंत, कोणती अभिनेत्री काय म्हणाली?