कुऱ्याडीनं वार करुन हत्या! गोंदियातल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्याचा कुणी घेतला जीव?

कुऱ्हाडीने वार करून आश्रम शाळेतील एका कर्मचाऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुऱ्याडीनं वार करुन हत्या! गोंदियातल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्याचा कुणी घेतला जीव?
प्रातिनिधिक फोटो

गोंदिया : गोंदियात एक धक्कादायक प्रकार घडाला आहे. कुऱ्हाडीने वार करून आश्रम शाळेतील एका कर्मचाऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. एका आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यावर एवढा राग कुणाचा? का या कर्मचाऱ्याची एवढी निर्घृण हत्या करण्यात आली? एसे एक ना अनेक सावल या खळबळजनक घटनेने उपस्थित केले आहेत.

कर्मचाऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार

गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील पांढरवानी शिवरटोला येथील ही घटना आहे. दरवन वाढवे असे हत्या झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या व्यक्तीचे वय 50 वर्ष होतं. यांची काही अज्ञात लोकांनी कुऱ्हाडी ने डोक्यावर वार करून हत्या केल्याची घटना घडली असून आरोपीनी त्यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे.

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

दरवन वाढवे हे दरेकसा येथील आश्रम शाळेत नोकरी करत होते. मग एका आश्रम शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने असे काय कुणाचे बिघडवले होते की त्यांची हत्या झाली? असे सावल पोलिसांसमोरही उपस्थित झाले आहेत. या हत्येमागे कोण आहे, आरोपी कुठे आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सालेकसा पोलिस याचा पुढील तपास करत आहेत. हे अज्ञात आरोपी पकडण्याचे आव्हान आता सालकेसा पोलिसांसमोर असणार आहे.

बेस्ट मायलेज आणि अधिक बूट स्पेसवाल्या टॉप 5 टू व्हीलर्स, किंमत 65000 रुपये

Shardul Thakur: ‘झुकती है दुनिया झुकानेवाला…’, आपल्या लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर झुकला हा दिग्गज क्रिकेटपटू

Video : ‘घर की मुर्गी दाल बराबर’, शिवसेना आमदाराची नाराजी जाहीर व्यासपीठावर उघड

Published On - 6:23 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI