AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंना कॅबिनेट दर्जासाठी आटापिटा, शिवसेना कृषि खात्यावर, तर आव्हाड ‘गृहनिर्माण’वर अडल्याची चर्चा

एकनाथ खडसेंना कार्यकारी अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. (Eknath Khadse will get Executive presidency post)

खडसेंना कॅबिनेट दर्जासाठी आटापिटा, शिवसेना कृषि खात्यावर, तर आव्हाड 'गृहनिर्माण'वर अडल्याची चर्चा
| Updated on: Oct 23, 2020 | 12:39 PM
Share

मुंबई : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. मात्र त्यांना नेमकं कोणतं पद मिळणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. शिवसेना हे कृषीमंत्रीपद सोडायला तयार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडही आपलं मंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यामुळे महाविकासआघाडीतील अंतर्गत वाद समोर येत आहे. एकनाथ खडसेंना कार्यकारी अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. (Eknath Khadse will get Executive presidency post)

एकनाथ खडसेंसारखा एवढा मोठा नेता जर राष्ट्रवादीत प्रवेश करत असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. खडसेंसारखा चेहरा जर पक्षात आला तर त्यांना सन्मानजनक जबाबदारीबाबत राष्ट्रवादीने पडताळणी केली होती. मात्र आता एकनाथ खडसेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा सुरु आहे.

कारण जितेंद्र आव्हाड यांना गृहमंत्रिपद सोडायचं नाही. तर खडसेंकडे कृषिमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सध्या कृषिमंत्रीपद हे शिवसेनेकडे आहे. दादा भुसे हे त्या खात्याचे मंत्री आहे. ते मंत्रिपद सोडायला शिवसेना तयार नाही. त्यामुळे जर खडसेंना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा द्यायचा असेल तर नियोजन मंडळांचे उपाध्यक्षपद त्यांना दिलं जाऊ शकतं, असे बोललं जात आहे.

नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदालाही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचं पुनर्वसन नेमकं कसं होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी मोठा आटापिटा आणि शर्थीचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरु आहेत. खडसेंसारख्या नेत्याला इतर जुजबी पद दिली तर ती सन्मानजनक वागणूक ठरणार नाही.

सध्या शिवसेना नेते दादा भुसे कृषी मंत्रालयाची धुरा सांभाळतात. खडसेंना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी सेना-राष्ट्रवादीत खात्यांची अदलाबदल केली जाऊ शकते. कृषी मंत्रालयाच्या मोबदल्यात राष्ट्रवादीकडे असलेले गृहनिर्माण खाते शिवसेनेला दिले जाण्याची शक्यता आहे.

गृहनिर्माण खाते शिवसेनेकडे गेल्यास जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मंत्रिपद राहणार नाही. त्यामुळे सध्या जयंत पाटील यांच्याकडे असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खडसेंचा राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश 

गेल्या 4 दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होणार आहे.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.

दोन दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा

गेली साडेतीन दशकं भाजपला वाढवणारे आणि भाजपला बळ वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी 21 ऑक्टोबर 2020 रोजी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. “मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले.

(Eknath Khadse will get Executive presidency post)

संबंधित बातम्या : 

कोणी पद देणार म्हणून नाथाभाऊ पक्षप्रवेश करत नाही : एकनाथ खडसे

नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीकेसाठी करु नये, रावसाहेब दानवेंचा सल्ला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.