Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची टॉप सिक्रेट बैठक सुरू, विश्वासूंना बैठकीतून वगळले; आरपारचा निर्णय घेणार?

Eknath Shinde : गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांची बंडखोरांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून ही बैठक सुरू आहे. बैठकीतून एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू लोकांनाही बाहेर ठेवण्यात आले आहेत. फक्त मंत्री आणि अमदारांनाच बैठकीत घेतल्याची माहिती आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची टॉप सिक्रेट बैठक सुरू, विश्वासूंना बैठकीतून वगळले; आरपारचा निर्णय घेणार?
एकनाथ शिंदेंची टॉप सिक्रेट बैठक सुरू, विश्वासूंना बैठकीतून वगळले; आरपारचा निर्णय घेणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 5:06 PM

गुवाहाटी: शिवसेनेचे (shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गुवाहाटीत महत्त्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेते जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय या बैठकीत आरपारचे निर्णय घेण्यात येणार असल्यानेच शिंदे यांनी त्यांच्या विश्वासू लोकांना बैठकीपासून लांब ठेवल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाकडून आरपारचे कोणते निर्णय घेतले जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. या बैठकीत कायदेशीर बाबी, प्रहारमध्ये विलीन होणे, भाजपमध्ये (bjp) विलीन होणे, राज्यपालांना नवा गट स्थापन केल्याचं पत्रं देणे यासह भाजपसोबत गेल्यास सत्तेचा फॉर्म्युला काय असेल आणि कुणाला कोणती पदं द्यायची यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांची बंडखोरांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून ही बैठक सुरू आहे. बैठकीतून एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू लोकांनाही बाहेर ठेवण्यात आले आहेत. फक्त मंत्री आणि अमदारांनाच बैठकीत घेतल्याची माहिती आहे. ही अत्यंत गोपनीय बैठक असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे रुग्णालयातून आले आहेत. ते आजपासून सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्यपालांकडे पत्रव्यवहार करण्याबाबतचे निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

कायदेशीर बाबींवर चर्चा

या बैठकीत कायदेशीर बाबींवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. उपसभापती नरहरी झिरवळ यांनी त्यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबतचा आक्षेप फेटाळून लावला आहे. तसेच 16 आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. गटनेतेपदी अजय चौधरीच असण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासमोर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. त्यातून काय मार्ग काढायचा यावर या बैठकीत चर्चा केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

वेगळा गट की विलीनिकरण?

या बैठकीत वेगळा गट स्थापन करायचा की प्रहार किंवा भाजपमध्ये प्रवेश करायचा याबाबतचा निर्णयही घेण्यात येणार आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे वेगळा गट स्थापन करण्यात अडचणी आहेत. त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबतची चर्चा या बैठकीत होणार आहे.

महाराष्ट्रात परतण्यावर चर्चा

दरम्यान, महाराष्ट्रात परतण्यावरही या बैठकीत चर्चा सुरू आहे. कुणीही घाबरू नका. सर्वांची सुरक्षा केली जाईल. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेची सर्वांना सुरक्षा असणार आहे. त्यामुळे कुणीही घाबरू नका, असं शिंदे यांनी या आमदारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.