Eknath Shinde : एकनाथ शिंदे राज्याचे नवे ‘ठाणे’दार, 30 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना आता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री घोषणा ही बाबही अनेकांसाठी सरप्राईजिंग होती. 

Eknath Shinde : एकनाथ शिंदे राज्याचे नवे 'ठाणे'दार, 30 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ
30 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली पद आणि गोपीनीयतेची शपथImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 8:22 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य अखेर संपलं आहे. आज एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री (Maharashtra new Cm) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. महाविकास आघाडीला फाटा देत एकनाथ शिंदे यांनी आज अखेर भाजपशी घरोबा (BJP) करत नवं सरकार स्थापन झालं आहे. राजभवन इथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनीही आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास हा तितकाच रंजक आहे. एक रिक्षावाला ते राज्याचे 30 वे मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा राहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आधी फडणवीसांच्या नावाची चर्चा असताना आता अचानक एकनाथ शिंदे यांच्या नावाची थेट मुख्यमंत्री घोषणा ही बाबही अनेकांसाठी सरप्राईजिंग होती.

एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द

  1. 1980 मध्ये त्यांनी शिवसेना शाखाप्रमुख पदावरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली .
  2. 1997 मध्ये ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आल्यावर त्यांनी अधिक सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
  3. यानंतर त्यांनी ठाणे महापालिकेत अनेक पदे भूषवली आणि त्यानंतर 2004 मध्ये आमदार म्हणून राज्याच्या राजकारणात आले.
  4. त्यानंतर एकनाथ शिंदे हे सलग विजयी होत गेले आणि दोनदा राज्यात मंत्रीही राहिले.
  5. यापूर्वी ते महाराष्ट्र सरकारमध्ये नगरविकास मंत्री होतं, तसेच अन्यही महत्वाची पद होती.
  6. एकनाथ शिंदे यांच्याकडे एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हरही असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
  7. तसेच अनेक ठिकाणी शिंदे यांची जमीन आहे, तसेच शिंदे यांच्याकडे अनेक गाड्याही आहेत.
  8. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यातून सर्वात जास्त चर्तेत राहिलेलं नाव आहे.
  9. शिवसेनेतला सध्याच्या घडीचा सर्वात वजनदार नेते म्हणूनही शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं.
  10. त्यामुळे हे शिंदे हे आपल्या राजकीय वजनाच्या जोरावर शिवसेनेतील चाळीसच्या आमदार आणि इतर अपक्षांना एकत्र करू शकले.

बंडानंतर राज्यात मोठं सत्तांतर

एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतानाही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख केला आहे. तसेच बाळासाहेबांच्या पायाशी बसलेला फोटो त्यांनी ठेवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सर्वात मोठं सत्तांतर घडून आलं. महाविकास आघाडी सरकारला याचमुळे पाउतार व्हावं लागलंय. तर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आधी मी कॅबिनेटमध्ये नाही बोलणारे फडणवीसही आता पुन्हा कॅबिनेटमध्ये दिसणार आहेत. फडणवीसांचं उपमुख्यमंत्री होणं हेही तेवढेच सरप्राईज देणारं आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.