भाजपाचे ‘हे’ माजी मंत्री शिवसेनेत येण्यास इच्छूक, विनायक राऊतांचा दावा

| Updated on: Oct 08, 2022 | 8:30 AM

भाजपाचे माजी मंत्री शिवसेनेत येण्यास इच्छूक असल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे.

भाजपाचे हे माजी मंत्री शिवसेनेत येण्यास इच्छूक, विनायक राऊतांचा दावा
Image Credit source: TV9marathi
Follow us on

मुंबई :  भाजपाच्या (BJP) गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाचे माजी मंत्री संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये (Shiv sena) येण्यास इच्छूक असल्याचा दावा शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. विनायक राऊत यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यास इच्छूक आहेत. त्यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. संजय देशमुख यांनी यापूर्वी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ते शुक्रवारी देखील शिवसेना भवनला आले होते, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. एकीकडे शिवसेनेतून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत आहेत. मात्र दुसरीकडे आता विनायक राऊत यांच्याकडून संजय देशमुख हे शिवसेनेत येणार असल्याचा दावा केला जात आहे. ही बातमी निश्चितच शिवसेनेसाठी दिलासा देणारी ठरू शकते.

नेमकं काय म्हटलं राऊत यांनी?

विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे. भाजपाचे माजी मंत्री संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यास आणि काम करण्यास इच्छूक असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की,  संजय देशमुख हे शिवसेनेमध्ये येण्यास इच्छूक आहेत. त्यांनी यापूर्वी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ते शुक्रवारी पुन्हा शिवसेना भवनला आले होते.

हे सुद्धा वाचा

 गळती रोखण्याचे आव्हान

गेल्या काही दिवसांत शिवसेनेसाठी दिलासादायक घटना घडत आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता संजय देशमुख हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा विनायक राऊत यांच्यावतीने करण्यात येत आहे.  या शिवसेनेसाठी दिलासादायक घटना आहेत. मात्र तरी देखील शिवसेनेत येणाऱ्यांपेक्षा जाणाऱ्यांचेच प्रमाण अद्यापही अधिक आहे. अनेक जण शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान पक्षासमोर आहे.