आयुष्यभर ढोलकी आणि तमाशाच्या सानिध्यात राहणाऱ्यांनी मला शिकवू नये : माजी आमदार राजेंद्र राऊत

| Updated on: Oct 17, 2019 | 1:35 PM

आयुष्यभर ढोलकी आणि तमाशा यांच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांनी मला महिलांचा सन्मान शिकवू नये असं वक्तव्य बार्शी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत (Ex MLA Rajendra Raut) यांनी केलं.

आयुष्यभर ढोलकी आणि तमाशाच्या सानिध्यात राहणाऱ्यांनी मला शिकवू नये : माजी आमदार राजेंद्र राऊत
Follow us on

सोलापूर : आयुष्यभर ढोलकी आणि तमाशा यांच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांनी मला महिलांचा सन्मान शिकवू नये असं वक्तव्य बार्शी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे बंडखोर उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत (Ex MLA Rajendra Raut) यांनी केलं.

मी (Ex MLA Rajendra Raut)  निष्कलंक असून आतापर्यंत कधीच महिलांचा अवमान केला नाही. यापुढेही कधी करणार नसल्याचे सांगत, राजकारणासाठी माझा तितकाच व्हिडिओ एडिट करुन पसरवल्याचा आरोप राऊत यांनी केला.

बार्शी विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्य गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे (Rajendra Mirgane) यांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरले होते. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्य गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी बार्शी पोलिसांत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत असा सामना आहे.

शिवसेनेच्या दिलीप सोपल यांना भाजपाचे राज्यमंत्री दर्जा असलेले राज्य गृहनिर्माण संस्थेचे सदस्य राजेंद्र मिरगणे यांचा पाठिंबा आहे. विधानसभा निवडणूक  राष्ट्रवादीच्या सोपल यांच्या सांगण्यावरून राजेंद्र मिरगणे यांनी लढवल्याचा आरोप राऊत यांनी केला.

माझ्याबाबतीत अनेक टीका त्यांच्याकडून केली जाते, त्यामुळे मी बोललो. मात्र मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं, असं सांगत आपण त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा मदत केल्याचं राऊत यांनी म्हटलं.