तुमचं काम माहीत आहे, बोलत राहिलात तर ट्रेलरही देईन, निलेश राणे-रोहित पवारांमध्ये ट्विटर वॉर

| Updated on: May 20, 2020 | 7:59 AM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पॅकेजची मागणी केल्यानंतर निलेश राणेंनी त्यावर आक्षेप घेणारं ट्वीट केलं होतं. (Nilesh Rane Rohit Pawar Twitter War)

तुमचं काम माहीत आहे, बोलत राहिलात तर ट्रेलरही देईन, निलेश राणे-रोहित पवारांमध्ये ट्विटर वॉर
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यात रंगलेला ट्विटर वॉर चांगलाच पेटला आहे. “तुमचं काम मला माहीत आहे, बोलत राहिलात तर त्याचा पण ट्रेलर देईन” अशा शब्दात निलेश राणेंनी रोहित पवारांच्या ट्वीटला उत्तर दिलं. (Nilesh Rane Rohit Pawar Twitter War)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पॅकेजची मागणी केल्यानंतर निलेश राणेंनी त्यावर आक्षेप घेणारं ट्वीट केलं होतं. या ट्वीटला नातू रोहित पवार यांनी उत्तर दिल्यापासून दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगला आहे.

“आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो.” असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निलेश राणे यांना दिलेल्या उत्तरावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

“बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुमचं काम माहीत आहे मला, बोलत राहिलात तर त्याचा पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तुम्हाला” असे एकेरी भाषेतील ट्वीट निलेश राणे यांनी प्रत्युत्तर म्हणून केले.

असा सुरु झाला ट्विटर वॉर

निलेश राणे यांचे पहिले ट्वीट

“साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा?? साखर उद्योगाला वाचवा; शरद पवारांचं मोदींना पत्र” असे ट्वीट निलेश राणे यांनी 15 मे रोजी केले होते.

रोहित पवार यांनी दिलेले उत्तर

“मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी.” असे ट्वीट रोहित पवार यांनी 16 मे रोजी केले होते.

निलेश राणे यांचे दुसरे ट्वीट

“मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुमच्यासाठी चांगली आहे, तुम्हाला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली??? मतदारसंघावर लक्ष द्या सगळीकडे नाक टाकू नका, नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुमची” अशा आशयाचे ट्वीट निलेश राणे यांनी रोहित पवारांना उत्तर देण्यासाठी केले.

राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या ट्विटर वॉरमध्ये उडी

संबंधित बातमी : रोहित तू तुझ्या मतदारसंघाकडे लक्ष दे, निलेश राणेंचा रोहित पवारांना सल्ला

(Nilesh Rane Rohit Pawar Twitter War)