रोहित तू तुझ्या मतदारसंघाकडे लक्ष दे, निलेश राणेंचा रोहित पवारांना सल्ला

"रोहित तू तुझ्या मतदारसंघाकडे लक्ष दे", असा सल्ला माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Nilesh Rane criticized on Rohit Pawar) यांना दिला आहे.

रोहित तू तुझ्या मतदारसंघाकडे लक्ष दे, निलेश राणेंचा रोहित पवारांना सल्ला
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 2:01 PM

मुंबई : “रोहित तू तुझ्या मतदारसंघाकडे लक्ष दे”, असा सल्ला माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Nilesh Rane criticized on Rohit Pawar) यांना दिला आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर उद्योगासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये पवारांनी साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. त्याला केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली होती. यानंतर निलेश राणेंनी ट्विटरवरुन साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झाले पाहिजे, असं म्हटले होते. या ट्वीटवर रोहित पवार यांनी उत्तर दिल्याने सध्या या दोन तरुण नेत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरु असल्याचे दिसत (Nilesh Rane criticized on Rohit Pawar) आहे.

निलेश राणे म्हणाले, “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??”

निलेश राणेंच्या या ट्वीटनंतर रोहित पवार यांनी निलेश राणे यांना उत्तर देत ट्वीट केले होते.

“मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार यांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ आणि इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. शरद पवार प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदी त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी”, असं ट्वीट करत रोहित पवार म्हणाले.

मात्र रोहित पवारांच्या या ट्वीटनंतर निलेश राणे हे चांगलेच भडकले. यानंतर निलेश राणेंनी ट्वीट करत रोहित यांच्यावर टीका केली.

निलेश राणे म्हणाले, “मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी.”

“हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय”, असंही ट्वीट करत निलेश राणे यांनी रोहितवर टीका केली.

संबंधित बातम्या :

अडचणीतील साखर क्षेत्राला आर्थिक मदत द्या, शरद पवारांनी पंतप्रधानांना सुचवले सहा उपाय

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.