Sanjay Raut : आमदार शिंदे गटाचे पण भवितव्य भाजपच्या हातात, बहुमतानंतरही राऊतांचे टीकास्त्र सुरुच

राजकारणात कधी इतिहास विसरायचा नसतो. पण आता राजकीय स्वार्थ साधल्यानंतर अनेकांना त्याचा विसर पडत आहे. इमाम सोडल्यावरच माणुस या स्तराला जातो. आता उद्धव ठाकरे यांच्याबाबतही बंडखोरांच्या मनात राग आहे. शिवसेनेतील याच चार लोकांनी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहचवले असल्याची आठवणही राऊतांनी बंडखोरांना करुन दिली आहे.

Sanjay Raut : आमदार शिंदे गटाचे पण भवितव्य भाजपच्या हातात, बहुमतानंतरही राऊतांचे टीकास्त्र सुरुच
संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 5:14 PM

मुंबई : शिवसेनेतील आमदारांच्या बंडापासून ते सत्ता स्थापनेपर्यंत (Sanjay Raut) संजय राऊत हे चर्चेत राहिलेले आहेत. (Rebell MLA) बंडखोर आमदारांनी देखील ही सर्व परस्थिती निर्माण होण्यासाठी त्यांनाच जबाबदार धरले आहे. असे असताना दरम्यानच्या काळात सत्ता स्थापनही झाली मात्र, आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहे. आता कुणाला दोष द्यायचा म्हणून मला दोषी ठरवले जात आहे. पण गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका (Shivsena) शिवसेनेची कधीच राहिलेले नाही. त्यांना जे करायचे होते ते केले आता माझ्यावर आरोप करुन काही उपयोग होणार नसल्याचे राऊतांनी बंडखोरांना सुनावले आहे. शिवाय बंडखोर आणि अपक्ष असे 50 आमदार हे शिंदे गटाकडे आहेत पण त्यांचे भवितव्य हे भाजपाच्या हाती असल्याचे सांगत पुढचा काळ त्यांच्यासाठी अंधकारमय असणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

स्वार्थ साधला, जनतेच्या मनाचे काय?

आज जरी बंडखोर आमदार हे निधीचा तुटवडा, हिंदुत्व आणि अनैसर्गिक युती यासारखी कारणे देत असली तरी त्यांनी राजकीय स्वार्थ साधलेला आहे. हे न समजण्या इतपत आता कोणी अडाणी राहिलेले नाही. हा सर्व ड्रामा भाजपाची खेळी आणि नेत्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी होती.यामध्ये ते यशस्वीही झाले असतील पण जनतेला हा निर्णय आवडलेला नाही. उद्या जनतेसमोर जावेच लागेल तेव्हा त्यांचा हा निर्णय योग्य की अयोग्य याता हिशोब तर द्यावाच लागणार आहे. त्यामुळे हा काही उठाव नाही आणि हे मानायला जनता काही तयार नसल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

आज ज्यांचा द्वेष त्यांच्यामुळेच सत्ता भोगली

राजकारणात कधी इतिहास विसरायचा नसतो. पण आता राजकीय स्वार्थ साधल्यानंतर अनेकांना त्याचा विसर पडत आहे. इमाम सोडल्यावरच माणुस या स्तराला जातो. आता उद्धव ठाकरे यांच्याबाबतही बंडखोरांच्या मनात राग आहे. शिवसेनेतील याच चार लोकांनी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहचवले असल्याची आठवणही राऊतांनी बंडखोरांना करुन दिली आहे. त्याची परतफेड अशाप्रकारे होईल याची कुणाला कल्पानाही नव्हती. मात्र, पुढे स्वार्थ दिसला की माणुस कोणत्या स्तराला जातो याचे उदाहरण सबंध राज्याने पाहिलेले आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करुन आपण काहीच केले नाही अशा अविर्भावात आमदार असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

पक्ष कुणाच्या ताब्यात जाणार नाही

शिंदे गटाला मान्यता दिल्याने आता पक्षावरही दावा केला जाणार का असा सवाल नव्याने उपस्थित होऊ लागला आहे. मात्र, आमदार म्हणजेच पक्ष असे नाही तर यामागे उभारले गेलेले संघटन महत्वाचे आहे. मोजकी लोक विकले गेले म्हणजे त्याचा परिणाम ना पक्षावर होणार आहे ना त्या संघटनेवर. कोणताही पक्ष कुणाच्या ताब्यात जाणार नसल्याचे म्हणत शिवसेना ही ठाकरेंचीच राहणार असल्याचे राऊतांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.