Ajit Pawar | ‘अजित पवार तुम्ही घरी नाहीत…’ जितेंद्र आव्हाडांच ‘दादांना’ सणसणीत प्रत्युत्तर

Ajit Pawar | सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगल आहे. अजित पवार यांनी थेट खासदार अमोल कोल्हे यांना टार्गेट केलय. या सगळ्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना काही गोष्टींची आठवण करुन दिली. 'पाडून दाखवतो म्हणणारी मोठी माणस आहेत' असा टोलाही लगावला.

Ajit Pawar | 'अजित पवार तुम्ही घरी नाहीत...' जितेंद्र आव्हाडांच 'दादांना' सणसणीत प्रत्युत्तर
ajit pawar and jitendra awhad
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 8:59 AM

मुंबई : “प्रफुल्ल पटेल साहेबांनी भविष्य वर्तवलेलं घड्याळ आम्हालाच मिळणार, तेव्हा आम्ही इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली. निवडणूक आयोगाने दोघांच्या वकिलांसमोर सांगितलेलं की, आमच्याबद्दल म्हणजे निवडणूक आयोगाबद्दल कोणी भविष्य वर्तवू नका. आम्ही कधीच बोलत नाही की, पक्ष-चिन्ह आम्हालाच मिळणार. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. त्यांच्या निर्णयाबद्दल बोलण चुकीचच आहे” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. अजितदादा गट आणि शिंदे गटात जागावाटपावरुन वाद होण्याची शक्यता आहे, या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “दुसऱ्याच्या घरात डोकावायच नसतं. त्यांच्या घरात काय चाललय? भांडण चालू आहे का? आम्हाला काय करायचय? आम्ही आमचा संसार बघू. भाजपा दोघांना घरचा रस्ता दाखवणार. शिंदे आणि अजितदादा गट दोघांना कमळाच्या चिन्हावर निडवणूक लढवावी लागणार”

दादानी सांगितलय की, घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू त्यावर वक्त आने पर सब सामने आयोगा असं उत्तर आव्हाडांनी दिलं. अमोल कोल्हेंच्या बाबतीत अजित पवार म्हणाले की, कसा निवडून येतो ते बघतोच त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या दिवशीचा किस्सा सांगितला. “दमदाटी करण हा अजित दादाचा स्वभाव दोष आहे. पवार साहेबांच्या राजीनाम्याच्या दिवशी मी बघितल, ए तू गप, हे असं नाही चालत. तुम्ही घरी नाहीय. तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात. प्रत्येकाला मानसन्मान असतो. मी त्यांच्यापासून लांबच रहायचो” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘पाडून दाखवतो म्हणणारी मोठी माणस’

“पाडून दाखवतो म्हणणारी मोठी माणस आहेत. ते कोणालाही पाडू शकतात. ते 48 च्या 48 जागा निवडणूक आणू शकतात” असा आव्हाडांनी टोला लगावला. अमोल कोल्हे 27 ते 30 पर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. अमोल कोल्हेंना टॅकल करण्यासाठी अजित पवार आक्रमक झालेत का? त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “प्रत्येकाला घाबरवण कोणाला शक्य होत नाही. या जगात लोक यमालाही घाबरत नाहीत, तो कधीतरी येणारच. तर बाकीच्यांना काय घाबरायच?”

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.