बाळा भेगडे आणि भाजपच्या इच्छुक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

| Updated on: Sep 06, 2019 | 4:55 PM

राज्याच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election) जसजशा जवळ येत आहेत, तसतसे भाजपमधील (BJP) वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विरोधीपक्षातील अनेक बडे चेहरे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे एकीकडे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, दुसरीकडे जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची शक्यता वाढली आहे.

बाळा भेगडे आणि भाजपच्या इच्छुक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
Follow us on

पुणे: राज्याच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election) जसजशा जवळ येत आहेत, तसतसे भाजपमधील (BJP) वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विरोधीपक्षातील अनेक बडे चेहरे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे एकीकडे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, दुसरीकडे जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच भाजपमध्ये देखील अंतर्गत वाद समोर येण्यास सुरुवात झाली आहे. मावळमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. मावळचे आमदार आणि महाराष्ट्राचे पर्यावरण राज्यमंत्री (Environment Minister) बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्या नातेवाईकाने विधानसभेसाठी भाजपमधील इच्छुक उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे.

कल्पेश मराठे (Kalpesh Marathe) असे मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. या हल्ल्यात त्याला आपले पाय गमवावे लागले आहेत. यानंतर सुनिल शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पोलिसांनी चूकीची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. मावळ तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या तालमीतील शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा मानला जातो. यावेळी मात्र भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. यात इच्छूक उमेदवार सुनील शेळके आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यामध्ये ‘तू तू, मैं मैं’ चालू आहे. त्याचे रुपांतर आता हाणामारीतही झाले आहे.

बाळा भेगडे यांनी मात्र संपूर्ण प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत हात झटकले आहेत. तसेच या प्रकरणाला राजकीय रंग देवू नये असं म्हणत वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन केलं. त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर शंका व्यक्त केली. ते म्हणाले, “तळेगाव पोलीस स्टेशनवर (Talegaon Police Station) मोर्चा काढल्यानंतर कुठल्याही चुकीच्या गुह्याची नोंद झाली असेल, तर त्यावर करवाई करू.”

मावळमध्ये आतापर्यंत भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) “तू तू, मैं मैं” चालत होती. परंतु आता भाजपमध्येच अंतर्गत वाद वाढल्याने राष्ट्रवादी “वेट अँड वॉच”च्या भूमिकेत आहे. या घटनांचा आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या डोकेदुखीत वाढ होण्याची शक्यताव वर्तवली जात आहे.