काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

| Updated on: Sep 30, 2021 | 11:21 AM

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरातल्या सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल
Narendra-Modi-and-Praniti-Shinde
Follow us on

सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार शिंदे यांच्याविरुद्ध सोलापुरातल्या सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  केंद्र सरकारच्या विरोधात विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यावरही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन आणि गॅस सिलेंडर सह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रणिती शिंदे लवकरच मंत्रिमंडळात : विश्वजीत कदम

दरम्यान, दहा दिवसापूर्वी सोलापुरात काँग्रेसचा मेळावा पार पडला होता. यावेळी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत भाष्य केले होते. यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, “आमदार प्रणिती शिंदे आमच्यासोबत मंत्रिमंडळात नाहीत याची खंत वाटते. मात्र कदाचित लवकरच प्रणिती शिंदे या राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री होतील”. त्यामुळे सोलापुरात आढावा बैठकीसाठी आलेले कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांनाही चार्ज केल्याची चर्चा पाहायला मिळाली.

सोलापुरात विकासाच्या नावाने बोंब : प्रणिती शिंदे

सोलापूर शहर उत्तरमध्ये विकासाच्या नावाने बोंब असून, सोलापूर महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. चार वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे, असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

भ्रष्टाचार, अपुरा आणि आठ दिवसाआड पाणी पुरवठा, चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामे, मोदी सरकारकडून रोजच होत आलेली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दरवाढ, प्रचंड महागाई, कॉंग्रेस पक्षाने कोव्हिड काळात केलेली कामे हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून शहर उत्तर मध्ये संघटना मजबूत करण्याचे आवाहन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं होतं.

महानगरपालिका 2022 “कॉंग्रेस मनामनात कॉंग्रेस घराघरात” या अभियानाअंतर्गत सोलापूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने भारतीय चौक, माणिक चौक, कसबा गणपती शेजारी बाळिवेस चौक, टिळक चौक अश्या चार ठिकाणी युवक काँग्रेस शाखा आणि नामफलकाचे उद्द्घाटन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

संबंधित बातम्या  

“आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार”

आता खासगी क्षेत्रातही आरक्षण ? लवकरच शासनाकडे अहवाल सादर करणार, प्रणिती शिंदेंची माहिती