आता खासगी क्षेत्रातही आरक्षण ? लवकरच शासनाकडे अहवाल सादर करणार, प्रणिती शिंदेंची माहिती

आमदार प्रणिती शिंदे आज अनुसूचित जाती जमाती कल्याण समितीच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संवादादरम्यान त्यांनी खासगी क्षेत्रातील आरक्षणाबाबात भाष्य केले. "खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याबाबत आम्हाला अनेक निवेदनं आले आहेत. याबाबत आम्ही माहिती घेतली आहे. खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यासाठी आम्ही शासनाकडे अहवाल सादर करणार आहोत," अशी माहिती प्रणिती शिंदे यांनी दिली.

आता खासगी क्षेत्रातही आरक्षण ? लवकरच शासनाकडे अहवाल सादर करणार, प्रणिती शिंदेंची माहिती
PRANITI-Shinde


औरंगाबाद : खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याबाबत काँग्रेसच्या आमदार आणि अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षा प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी “खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यासाठी आम्ही शासनाकडे अहवाल सादर करणार आहोत,” असं सांगितलंय. ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधीने याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी वरील भाष्य केले. (Scheduled Caste Welfare Committee soon will submit report to government regarding reservation in private sector information given by Praniti Shinde)

खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यासाठी अहवाल सादर करणार

आमदार प्रणिती शिंदे आज अनुसूचित जाती कल्याण समितीच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संवादादरम्यान त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रश्नानंतर खासगी क्षेत्रातील आरक्षणावर भाष्य केले. “खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याबाबत आम्हाला अनेक निवेदनं आले आहेत. याबाबत आम्ही माहिती घेतली आहे. खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यासाठी आम्ही शासनाकडे अहवाल सादर करणार आहोत,” असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. मात्र, या अहवालात नेमके काय असेल, यावर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

सदस्यांनी वाचला तक्रारींचा पाढा 

दरम्यान, प्रणिती शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना समितीतील सदस्यांनी त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला. मुलांच्या वसतिगृहात पुरेशा सुविधा नसने, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे पूर्ण न करणे, दादासाहेब गायकवाड योजना सक्षमपणे न राबवणे याबाबत अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यांनी प्रणिती शिंदे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी अनुसूचित जातीमधील अनेक लोक वंचित आहेत. यांच्यासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणे गरजेचे असल्याची भावना  प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.

प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया :

इतर बातम्या :

राणेंवरील कारवाईनंतर नाशिक भाजप आक्रमक, मुख्यमंत्री आणि संजय राऊतांविरोधात 3 तक्रार अर्ज

“असे शब्द ‘सामना’ नेहमी वापरतो, मग पेपर जेलमधून काढायचा का?”

अनिल परबांच्या दबावामुळे राणेंवर कारवाई? राणे म्हणतात, आता कोर्टात जाणार

 

(Scheduled Caste Welfare Committee soon will submit report to government regarding reservation in private sector information given by Praniti Shinde)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI