AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“असे शब्द ‘सामना’ नेहमी वापरतो, मग पेपर जेलमधून काढायचा का?”

नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर आता भाजप नेते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वेळ आल्यावर करारा जवाब मिलेगा, असा सूचक इशाराच शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

असे शब्द 'सामना' नेहमी वापरतो, मग पेपर जेलमधून काढायचा का?
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 5:50 PM
Share

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाडमध्ये प्रथव वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीनही मंजूर केला. मात्र, नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर आता भाजप नेते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वेळ आल्यावर करारा जवाब मिलेगा, असा सूचक इशाराच शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिलाय. नारायण राणे यांना अटक ही लोकशाहीची हत्या असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केलाय. ते आज नागपुरात बोलत होते. (Sudhir Mungantiwar warns Shiv Sena after Narayan Rane’s arrest)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये अशाप्रकारचे शब्द नेहमी वापरले जातात, मग सामना पेपर जेलमधून काढायचा का? असा खोचक सवालही मुनगंटीवार यांनी शिवसेनेला विचारलाय. सत्ता काही दिवस तुमच्याकडे आहे. सत्ता तालीबानी झालीय, सत्ता फार काळ टिकणार नाही. राणेंचा शब्द योग्य नव्हता तर वेगळेही मार्ग होती. फडणवीसांच्या तोंडात कोरोना टाकू, थोबाडीत मारु हे शब्द कुणाचे होते? असा सवालही मुनगंटीवारांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बदल्याच्या भावनेने तक्रार करणं हे भाजपचं काम नाही. भाजप जनहिताचं काम करतो, असा दावाही मुनगंटीवार यांनी केलाय.

कालची घटना संविधानाच्या जिव्हारी लागलीय. वक्त है, बबूल के बिज बोये तर त्याची व्याजासकट परतफेड होत असते. सत्ता बदलण्याचं काम भाजप नाही जनता करणार. भाजपची रणनिती कुण्या पत्राविरोधात नाही, तर महाराष्ट्राच्या हिताची आहे, असंही मुनगंटीवार म्हणालेत.

राणेंच्या अटकेची CBI चौकशी करा – शेलार

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकला. त्यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

विनायक राऊत म्हणतात, ‘मग त्यात गैर काय?’

परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी काल नारायण राणे यांना अटक होण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेतली एक क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये ते राणेंच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना करत होते. यावर भाजपने आक्षेप नोंदवत हा मातोश्रीवरुन सगळा प्लॅन ठरला होता. आता परब यांना आम्ही कोर्टात खेचणार आहोत, अशी आक्रमक भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली. त्यावरच विनायक राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर त्यात गैर ते काय?, असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : आता भाजपनेही उद्धव ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य शोधलं, 5 पोलीस ठाण्यात तक्रारी देणार

मुख्यमंत्र्यांचं अज्ञान, अनिल परबांचा दबाव, राणेंच्या अटकेमागची CBI चौकशी करा, Video दाखवून भाजपची मागणी

Sudhir Mungantiwar warns Shiv Sena after Narayan Rane’s arrest

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.