‘पॉवरफुल्ल’ महिला राजकारणी, तीनवेळा आमदार, पण मंत्रीपद नाही; जाणून घ्या प्रणिती शिंदेंची राजकीय कारकिर्द

अभ्यासू आणि व्यासंगी राजकारणी, दांडगा लोकसंपर्क, आक्रमकता, मनमिळावू स्वभाव आणि प्रभावी वक्तृत्व कौशल्य या बळावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात आपली स्पेस निर्माण केली आहे. (know about social worker and politician Praniti Shinde)

'पॉवरफुल्ल' महिला राजकारणी, तीनवेळा आमदार, पण मंत्रीपद नाही; जाणून घ्या प्रणिती शिंदेंची राजकीय कारकिर्द
Praniti Shinde
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 9:21 AM

मुंबई: अभ्यासू आणि व्यासंगी राजकारणी, दांडगा लोकसंपर्क, आक्रमकता, मनमिळावू स्वभाव आणि प्रभावी वक्तृत्व कौशल्य या बळावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात आपली स्पेस निर्माण केली आहे. त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. वडील माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री असूनही प्रणिती यांनी राजकारणात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आमदार म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण मंत्री म्हणून सिद्ध करण्याची संधी त्यांना अद्याप मिळालेली नाही. आघाडीच्या राजकारणात काँग्रेसच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपद आल्याने मंत्रिपदाच्या स्पर्धेत त्या मागे पडल्या. मात्र, मंत्रिपद मिळालं नसलं तरी त्यांचं काम काही थांबलेलं नाही. कोण आहेत प्रणिती शिंदे? कसं आहे त्यांचं राजकारण? याचा घेतलेला हा आढावा. (know about social worker and politician Praniti Shinde)

वयाच्या 28 व्या वर्षी आमदार

प्रणिती शिंदे या वयाच्या 28व्या वर्षीच आमदार झाल्या. 2009मध्ये त्यांनी सोलापुरातून पहिली निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी 33 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. सलग तीन वेळा त्या विधानसभेवर निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असतानाही त्या निवडून आल्या हे विशेष.

कायद्याच्या पदवीधर

प्रणिती शिंदे या कायद्याच्या पदवीधर आहे. त्यांचं महाविद्यालयीन आणि कायद्याचं शिक्षण मुंबईतच झालं. त्यांनी 2001 मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमदून कला शाखेची पदवी घेतली. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबीची पदवी घेतली. हुशार आणि अभ्यासू विद्यार्थीनी म्हणून त्या महाविद्यालयात प्रसिद्ध होत्या.

वडिलांकडून राजकारणाचे धडे

प्रणिती यांना ग्लॅमरस राजकारणी म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हे देशातील मोठे नेते आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले सुशीलकुमार शिंदे हे माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री आहेत. तसेच शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीही आहेत. प्रणिती यांच्यावर बालपणापासून राजकारणाचे संस्कार झाले. वडिलांकडे पाहूनच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. घरी राजकारणी मंडळींच्या रंगणाऱ्या गप्पा, चर्चा या वातावरणातूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यातूनच त्यांची जडणघडण झाली.

सामाजिक कार्य

राजकारणासह प्रणिती या सामाजिक कार्यातही तितक्याच व्यस्त असतात. जाई जुई विचार मंचाच्या माध्यमातून त्यांचं सामाजिक कार्य सुरू असतं. त्या या संघटनेच्या संस्थापक आहेत. उशांचे कव्हर तयार करणे, फाईल फोल्डर तयार करणे, हस्तकला आदी कामं या संस्थेच्या माध्यमातून केली जातात. त्यातून बेरोजगारांना रोजगारही मिळतो. शिवाय कला, संस्कृती, दलितांचा विकास, शिक्षण, साक्षरता आरोग्य, कुटुंब, रोजगार, कामगार, पायाभूत सुविधा आदी विषयांवरही ही संस्था काम करते.

विठ्ठलाचे निस्सीम भक्त

शिंदे कुटुंब पंढरीचा विठ्ठल आणि श्रीगणेशाचे निस्सीम भक्त आहेत. शिंदे कुटुंबीय कोणतंही काम करण्यापूर्वी विठ्ठलाचं दर्शन घेतातच. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा त्यांनी विठ्ठल मंदिराला मोठा निधीही दिला होता.

मंत्रिपदाला हुलकावणी

सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या प्रणिती यांना 2019मध्ये मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं. त्या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. शिवाय त्यांच्या आमदारकीची दोन टर्मही पूर्ण झालेली असल्याने त्यांना ही संधी मिळेल असं वाटत होतं. मात्र, आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपदं आल्याने प्रणिती यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. युतीच्या काळात सोलापूरकडेही मंत्रिपद होतं. सुभाष देशमुख हे कॅबिनेट तर विजयकुमार देशमुख हे राज्यमंत्री होते. त्या आधी उत्तमप्रकाश खंदारेही मंत्री होते. त्यामुळे प्रणिती यांच्या रुपाने सोलापूरला मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती. (know about social worker and politician Praniti Shinde)

संबंधित बातम्या:

राजकारणात प्रवेश कसा झाला?, आदिती तटकरेंनी सांगितलं गुपित; वाचा राजकीय प्रवासाची चित्तरकथा!

वयापेक्षाही जास्त संपत्ती असलेला युवा नेता; जाणून घ्या कोण आहेत ऋतुराज पाटील?

वडील न्यायाधीश झाल्याने वकिली सोडून मुंबई गाठली, अडवाणींच्या रथयात्रेने प्रभावित; मंगलप्रभात लोढा कसे घडले? वाचा

(know about social worker and politician Praniti Shinde)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.