Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

| Updated on: Aug 31, 2020 | 6:52 PM

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Former President Pranab Mukherjee passes away)

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन
Follow us on

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज (31 ऑगस्ट) निधन झाले. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची दु:खद बातमी दिली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Former President Pranab Mukherjee passes away)

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती कालपासून अधिकच ढासळली होती. फुफ्फुसातील संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे आज सकाळी लष्करी रुग्णालयाने सांगितले होते. संकटमोचक हरपल्याची राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

“मी जड अंतकरणाने तुम्हाला सांगू इच्छितो की, आरआर रुग्णालयातील डॉक्टरांचे प्रयत्न, लोकांच्या प्रार्थना या सर्वानंतरही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले, “असे ट्विट त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी केले.

प्रणव मुखर्जी यांची कोरोना चाचणी 10 ऑगस्टला पॉझिटिव्ह आली होती. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे. मेंदूतील रक्तगाठ (ब्लड क्लॉट) काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

त्यानंतर त्यांच्या तब्ब्येत खालावत गेली. त्यांना काही काळ व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. पण त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला नाही. दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली 

‘माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या आठवड्याभरात ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या, त्या सर्वांना कोरोना चाचणी करुन आयसोलेट करण्याची विनंती करतो’ असं ट्वीट प्रणव मुखर्जी यांनी केलं होतं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून श्रद्धांजली 

प्रणव मुखर्जींचा अल्पपरिचय

प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. राष्ट्रपतीपद भूषवण्याआधी 2009 ते 2012 या काळात मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा होती. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 1969 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ‘प्रणवदा’ यांची राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. (Former President Pranab Mukherjee passes away)

संबंधित बातम्या :

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, अद्याप व्हेंटिलेटरवर