AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीवर गौतम अदानी-उद्धव ठाकरे तासभर चर्चा, चर्चेनंतर तर्कवितर्क सुरु

एकीकडे आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या प्रोजेक्टसाठी परराज्यात जाहिराती दिल्याचा आरोप केलाय, तर तिकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि उद्योजक गौतम अदानी यांची भेट झाली.

मातोश्रीवर गौतम अदानी-उद्धव ठाकरे तासभर चर्चा, चर्चेनंतर तर्कवितर्क सुरु
उद्धव ठाकरे - गौतम अदानीImage Credit source: TV9 Marathi
Jaywant Patil
Jaywant Patil | Updated on: Sep 21, 2022 | 5:54 PM
Share

मोहन देशमुख, टीव्ही ९, मुंबई : मातोश्रीवर आज दुपारी उद्योजक गौतम अदानी आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट झाली. गौतम अदानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.  Uddhav Thackeray मातोश्रीवरील ही चर्चा कोणत्या विषयावर होती, हे अजून समजू शकलेलं नाही. गौतम अदानी हे जेव्हा केंद्र सरकारचे जवळचे उद्योजक आहेत, असे आरोप होतात, तेव्हा भाजपाच्या विरोधीपक्षातील नेत्यांना Gautam Adani  गौतम अदानी भेटीला का गेले असावेत हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ही भेट अशावेळी झाली, जेव्हा आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी काही वेळापूर्वी वर्सोवा सी लिंकवरुन राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून कसं दूर लोटलं जात आहे, असे आरोप करत होते.

वर्सोवा वरळी सी लिंकची जाहिरात चेन्नईत केली जात आहे, पण महाराष्ट्रात का नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे या भेटीविषयी काही बोलतील का?

पण दुसरीकडे आज उद्धव ठाकरे हे देखील गोरेगावात शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.या आधी त्यांच्यात आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यात काय चर्चा झाली, यावर ते आपल्या भाषणात बोलतील का हा देखील प्रश्न आहे.

मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेनेच्या गटनेत्यांची आज बैठक आहे, गटनेत्यांकडून शपथपत्र घेतले जात आहेत, यासाठी काऊंटर देखील लावण्यात आलेले आहेत.

मुंबईतल्या नेस्को मैदानात दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेकडून दुसरीकडे दसरा मेळावा हा शिवाजीपार्कवरच कसा होईल यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार