गौतम गंभीर ‘ते’ काम करुच शकत नाही, दिग्गज क्रिकेटर समर्थनार्थ मैदानात

| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत 12 मे रोजी सात जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरही भाजपकडून पूर्व दिल्ली मतदारसंघातून उभा आहे. आम आदमी पार्टीकडून गंभीरविरोधात अतिशी मारलेना आणि काँग्रेसकडून अरविंदर सिंह लवली उभे आहेत. पण ऐन मतदानाच्या तोंडावर गौतम गंभीरवर आपने […]

गौतम गंभीर ते काम करुच शकत नाही, दिग्गज क्रिकेटर समर्थनार्थ मैदानात
Follow us on

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत 12 मे रोजी सात जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरही भाजपकडून पूर्व दिल्ली मतदारसंघातून उभा आहे. आम आदमी पार्टीकडून गंभीरविरोधात अतिशी मारलेना आणि काँग्रेसकडून अरविंदर सिंह लवली उभे आहेत. पण ऐन मतदानाच्या तोंडावर गौतम गंभीरवर आपने सनसनाटी आरोप केलाय, ज्यामुळे राजधानीतलं वातावरण तापलंय.

अतिशी या व्यवसायाने शिक्षिका आहेत. निवडणुकीच्या दोन दिवसाआधी राज्याच्या विकासाचे मुद्दे उठायला हवे, पण येथे दुसरंच प्रकरण चर्चेत आहे. दिल्लीत काही पत्रकं वाटण्यात आली आहेत, ज्यात अतिशी यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर लिहिण्यात आलंय. याचा आरोप आपने गौतम गंभीरवर केलाय. गंभीरनेही हा आरोप फेटाळत आपचे संयोजक अरविंद केजरीवाल, अतिशी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.

अतिशीच्या आई-वडिलांचा धर्म, त्यांचे कुण्या शिक्षकांशी असलेले संबंध आणि मनीष सिसोदियांशी जवळकी या सर्व बाबी पत्रकात लिहिल्या आहेत. याचा फायदा मतांसाठी होण्याची शक्यता दिसत नसली तरी मात्र थेट गौतम गंभीरवर हे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. अतिशी यांनी पत्रकार परिषदेत रडत-रडत गंभीरवर आरोप केले होते. एकीकडे स्टार सेलिब्रिटी असलेल्या गंभीरच्या रोड शोसाठी तुफान गर्दी होत होती. तर दुसरीकडे अतिशी यांचा जनसंपर्क कमी आहे. त्यामुळे अतिशी यांच्याविरोधात अशी पत्रकं काढण्याची गंभीरला काय गरज, असाही प्रश्न जाणकार उपस्थित करतात.

अतिशी यांच्याकडे निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा मार्ग होता. त्यांनी तसं न करता थेट पत्रकार परिषद घेतली आणि हे आरोप केले. अखेर त्यांनी दिल्लीत महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष आपच्याच नेत्या असलेल्या स्वाती मालीवाल आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा मतासाठी फायदा होवो ना होवो, पण राजकारण मात्र रंगलंय.

दिग्गज क्रिकेटर गंभीरच्या समर्थनार्थ मैदानात

दिल्लीतील या प्रकरणानंतर गंभीरचे माजी सहकारी त्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. सर्वात अगोदर क्रिकेटर हरभजन सिंहने गंभीरची पाठराखण केली. त्यानंतर माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही गंभीर असं करुच शकत नाही हे खात्रीने सांगितलं.

दिल्लीतील कालच्या गौतम गंभीरच्या संबंधीत घटनाक्रमाविषयी ऐकून धक्का बसला. मी त्याला चांगलं ओळखतो आणि खात्रीने सांगू शकतो, की तो महिलांविषयी असं बोलूच शकत नाही. विजय होऊ किंवा पराजय तो वेगळा विषय आहे. पण तो या सर्वांपेक्षा वेगळा माणूस आहे, असं हरभजन म्हणाला.

व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही गंभीर असं करु शकत नाही हे खात्रीने सांगितलं. गंभीरला मी गेल्या दोन दशकांपासून ओळखतो. त्याचा प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि महिलांविषयीचा आदर याबाबत चांगलं ओळखतो, त्याच्याविषयी खात्री देऊ शकतो, की तो असं करु शकत नाही, असं ट्वीट लक्ष्मण यांनी केलं.