AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 हजार कोटींची संपत्ती, पण रस्त्यावर भिकारी बनून फिरला भाजपचा मुंबईतील आमदार, असं का? यामागे कारण काय?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाच हजार कोटी रुपयांचा मालक असलेला आमदार रस्त्यावर भिकारी बनून दिसला. आता नेमकं कारण काय?

5 हजार कोटींची संपत्ती, पण रस्त्यावर भिकारी बनून फिरला भाजपचा मुंबईतील आमदार, असं का? यामागे कारण काय?
Parag ShahImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 8:35 AM
Share

तुम्ही कल्पना करा जर तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असेल आणि एक दिवस तुम्ही रस्त्यावर भीक मागताना रस्त्यावर दिसलात तर? सगळेजण चकीत होतील. काही लोक तर तुम्हाला ओळखणार देखील नाहीत. असेच काहीचे घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शहा यांनी केले आहे. ते रस्त्यावर भीक मागत फिरत होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की त्यांना कोणी ओळखूही शकले नाही.

कोण आहे ते आमदार?

घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शहा हे मुंबईतील एक प्रसिद्ध आणि संपन्न राजकारणी म्हणून ओळखले जातात. पाच हजार कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक असलेल्या या आमदाराने अलीकडेच एक अभूतपूर्व प्रयोग केला. आपल्या गुरूने दिलेल्या आज्ञेनुसार त्यांनी एक पूर्ण दिवस वेषांतर करून भिकारी म्हणून घाटकोपरच्या रस्त्यांवर घालवला.

नेमकं कारण काय?

ही घटना फक्त राजकीय स्टंट नव्हती, तर गुरूंच्या शिकवणुकीनुसार आत्मानुभव घेण्याचा एक प्रयत्न होता. पराग शहा यांनी साधे कपडे परिधान केले, चेहरा आणि देखावा बदलला आणि मतदारसंघातील गर्दीच्या रस्त्यांवर भिकारी म्हणून फिरू लागले. त्या दिवशी त्यांनी सामान्य माणसांच्या नजरेतून आपलाच मतदारसंघ पाहिला. लोकांची प्रतिक्रिया, दया, उपेक्षा, मदत आणि कधी कधी दुर्लक्ष या सगळ्या भावना त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या.

घाटकोपरसारख्या गर्दीच्या आणि व्यस्त भागात भिकारी म्हणून दिवस काढणे सोपे नव्हते. अनेक जण त्यांच्याकडे पाहून पुढे गेले, काहींनी थोडी मदत केली, तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या अनुभवातून आमदारांना सामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा प्रत्यक्ष जाणीव झाली असावी. पराग शहा यांचे हे पाऊल राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण करणारे ठरले आहे. कोट्यवधींचे मालक असतानाही गुरूंच्या आज्ञेला मान देऊन इतका कठीण अनुभव घेणे हे खरच कौतुकास्पद आहे. या प्रयोगाद्वारे ते सामान्य माणसांचे जीवन अधिक जवळून पाहिले आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग आमदार पराग शहा यांनी अनुभवला

घाटकोपरच्या रस्त्यांवर भिकारी म्हणून फिरणारा हा आमदार आज पुन्हा आपल्या नेहमीच्या भूमिकेत परतला असला, तरी त्या एका दिवसाचा अनुभव त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मतदारांसाठी दीर्घकाळ स्मरणात राहील, असे मत व्यक्त केले जात आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच