काँग्रेस नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन पत्र लिहिल्याचे राहुल गांधी म्हणालेच नाहीत : गुलाम नबी आझाद

| Updated on: Aug 24, 2020 | 5:13 PM

काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आज (24 ऑगस्ट) पक्षाच्या कार्यकारीणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली (Ghulam Nabi AZad on Rahul Gandhi statement).

काँग्रेस नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन पत्र लिहिल्याचे राहुल गांधी म्हणालेच नाहीत : गुलाम नबी आझाद
Follow us on

नवी दिल्ली : “काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या काही नेत्यांनी भाजपशी हातमिळवणी करुन काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं, असं वक्तव्य खासदार राहुल गांधी यांनी केलंच नाही”, असा खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ट्विटरवर केला आहे (Ghulam Nabi AZad on Rahul Gandhi statement).

“काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत काही माध्यमांनी चुकीची माहिती दिली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणालेच नाहीत. बैठकीत किंवा बैठकीबाहेर कुठेही त्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केलेलं नाही”, असं गुलाम नबी आझाद म्हणाले (Ghulam Nabi AZad on Rahul Gandhi statement).

“काँग्रेसमधील आमच्याच काही सहकाऱ्यांनी आमच्यावर काल गंभीर आरोप केले होते. भाजपला हाताशी धरुन आम्ही सोनिया गांधी यांना पत्र पाठवले, असा आरोप काही सहकाऱ्यांनी केला होता. त्यांनी हे आरोप सिद्ध केले तर मी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देईन, असं मी बैठकीत म्हणालो”, असं स्पष्टीकरण गुलाम नबी आझाद यांनी दिलं.

काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आज (24 ऑगस्ट) पक्षाच्या कार्यकारीणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रचंड घमासान झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बैठकीदरम्यान थेट ट्विट करत ‘राहुल गांधी यांनी आमच्यावर भाजपशी हातमिळवणी केला, असा आरोप केल्याचं म्हटलं. मात्र, थोड्यावेळाने त्यांनी ते ट्विट मागे घेतलं.

संबंधित बातमी : CWC Meeting | भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत