महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी, काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली

| Updated on: Feb 04, 2021 | 11:36 AM

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांच्या जागी शिवसेनेच्या नेत्याची वर्णी लागू शकते.

महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी, काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
महाविकास आघाडी
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर आता नव्या पदांची नियुक्ती होत आहे. त्यातच राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद (Maharashtra Deputy Chief Minister) तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरं उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना (Shiv Sena) अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांच्या जागी शिवसेनेच्या नेत्याची वर्णी लागू शकते. त्याबदलत्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवं आहे. (Congress demanding deputy CM post instead of Speaker of the Legislative Assembly)

लॉकडाऊनंतर आता राज्यात राजकीय रंग जोर धरु लागला आहे. तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे तुलनेने महत्त्वाची पदं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदामध्ये रस दाखवल्याचं सांगण्यात येत आहे.

काँग्रेसची नेमकी भूमिका काय?

काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा जोर धरत आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त होऊ शकतो. हे पद काँग्रेसने शिवसेनेला देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. मात्र त्याबदल्यात काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे.

शिवसेनेची अनुकूलता?

दरम्यान, काँग्रेसच्या या प्रस्तावाला शिवसेनेनेही अनुकूलता दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. जर शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळणार असेल, तर सेनेसाठी ते फायद्याचं ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपद घ्या आणि उपमुख्यमंत्रिपद द्या अशी काँग्रेसची भूमिका आहे.

राष्ट्रवादी मानणार का?

दरम्यान, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात ही पदांबाबत चर्चा होत असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा सध्याच्या सरकारमधील तिन्ही पक्षांमधील दुवा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे जे प्रस्ताव आहेत, ते राष्ट्रवादीला मान्य होतीलच असे नाही. राष्ट्रवादीही एखाद्या पदावर दावा सांगू शकते, असं राजकीय जाणकार सांगतात.

संबंधित बातम्या 

VIDEO | राजकीय वैर संपवत केक भरवला, मनिष जैन-एकनाथ खडसेंचे प्रेमाचे पर्व

(Congress demanding deputy CM post instead of Speaker of the Legislative Assembly)