Gopichand Padalkar : ‘केतकी चितळेच्या वक्तव्याचं समर्थन नाही, तिला मिळणाऱ्या वागणुकीचा निषेध’, गोपीचंद पडळकरांची भूमिका, राष्ट्रवादीवर निशाणा

Gopichand Padalkar : 'केतकी चितळेच्या वक्तव्याचं समर्थन नाही, तिला मिळणाऱ्या वागणुकीचा निषेध', गोपीचंद पडळकरांची भूमिका, राष्ट्रवादीवर निशाणा
गोपीचंद पडळकर, केतकी चितळे, शरद पवार
Image Credit source: TV9

अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्तव्याचं समर्थन नाही, मात्र तिला दिलेल्या वागणुकीचा निषेध असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय. तसंच पवारांनी संस्कार आणि संस्कृती शिकवण्याची गरज नाही. त्यांचे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र शिकला तर माती होईल, अशी जोरदार टीकाही पडळकर यांनी पवारांवर केलीय.

रवी लव्हेकर

| Edited By: सागर जोशी

May 18, 2022 | 6:05 PM

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेवर (Ketaki Chitale) राज्यात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज ठाणे कोर्टानं तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिने जामिनासाठी अर्ज केला असून थोड्याच वेळात त्यावर सुनावणी होत आहे. अशावेळी भाजप आमदार आणि पवार कुटुंबावर सडकून टीका करणारे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्तव्याचं समर्थन नाही, मात्र तिला दिलेल्या वागणुकीचा निषेध असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय. तसंच पवारांनी संस्कार आणि संस्कृती शिकवण्याची गरज नाही. त्यांचे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्र शिकला तर माती होईल, अशी जोरदार टीकाही पडळकर यांनी पवारांवर केलीय. गोपीचंद पडळकर आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माढा आणि पंढरपूर दौरा केला.

‘सरकारविरोधात बोलायचं थांबणार नाही’

माढ्यात बोलताना पडळकरांनी पाणी प्रश्नावरुनही पवारांवर निशाणा साधला. मागील 50 वर्षांपासून बारामतीकरांनी पाण्यावरच नाही तर सगळ्याच गोष्टींवर दरोडा टाकण्याचं काम केलं. अठरा पगड जातीच्या समाज घटकांना यांचं राजकारण आता लक्षात आलं आहे. राज्यात कायदा राहिलेला नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कायदा सुव्यवस्था मानत नाहीत. पोलीस बंदोबस्तात असतानाही आमदारांसह मंत्र्यांवर हल्ले, निदर्शनं आणि गोंधळ केला जातो. भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरणार नाही. इंदिरा गांधींच्या काळातही आणीबाणी लावून दोन वर्षे भाजपच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. आमचे कार्यकर्ते निर्भीड आहेत. ते सरकारविरोधात बोलायचं थांबणार नाहीत, असा इशाराही पडळकर यांनी दिलाय.

ओबीसी आरक्षणावरुनही निशाणा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही कोर्टाला पुढे करता. पण पदोन्नतीचं आरक्षण पवार घराण्याने घालवलं. मंत्री विजय वडेट्टीवार परदेशात आहेत. ओबीसींबाबत त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे. औरंगाबादेतील औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या संरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, असं आव्हानही पडळकर यांनी दिलंय.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें