गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं काम अंतिम टप्प्यात, 3 दिवसांत उद्धाटन

| Updated on: Feb 08, 2020 | 11:27 PM

राज्याच्या राजकारणात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ही संघटना लवकरचं नावारूपाला येणार (Gopinath Munde Pratishthan)  आहे.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं काम अंतिम टप्प्यात, 3 दिवसांत उद्धाटन
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ही संघटना लवकरचं नावारूपाला येणार (Gopinath Munde Pratishthan)  आहे. मुंबईतील वरळी भागात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे येत्या बुधवारी (12 फेब्रुवारी) या कार्यालयाचं उद्धाटन केले जाणार आहे. यानिमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी आपल्या वडिलांच्या नावे सुरु केलेल्या या अराजकीय संघटनेच्या व्यासपीठाला आता व्यापक स्वरूप द्यायला सुरुवात केल्याचंही दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीतील आपल्या पराभवाचे शल्य पंकजा मुंडे पचवू शकल्या नाहीत. त्यामुळे व्यथित झालेल्या पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर नाराजी देखील व्यक्त केली होती. यानंतर परळी येथे झालेल्या सभेत त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण राज्यभर काम करणार असल्याचे बोलून दाखवले होते. पंकजा यांच्या वक्तव्यानंतर सर्वांचेच लक्ष त्यांच्या पुढील वाटचालीवर लागले आहे .

गोपीनाथ गडावरील सभेत पंकजा यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजप सोडणार नाही. पण कोणतही पद न घेता समांतर यंत्रणा उभा करण्याचा आपला विचार असल्याचे बोलून दाखवत तशी घोषणाही त्यांनी केली. त्यानंतर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंकजांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर उपोषण करून स्वतःसाठी नवीन राजकीय व्यासपीठ देखील तयार केलं.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यातील दीन दुबळ्या, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे पंकजा यांनी आधीच स्पष्ट केले आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपमधील कोणतंही पद नाही. तरी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर उपोषण करून सामाजिक कार्याला नव्यानं सुरुवात केली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या या कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पंकजा मुंडेचे नवी राजकीय दिशा नेमकी काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं (Gopinath Munde Pratishthan)  आहे.