Bhagat Singh Kodhyari : राज्यपाल कोश्यारींनी त्या वक्तव्याबाबत अखेर माफी मागितली, तुफान टीकेनंतर म्हणतात माझी…

राज्यपालांवरची टीका काही केल्या थांबत नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असेही ते म्हणाले होते. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी अखेर माफी मागितले आहे.

Bhagat Singh Kodhyari : राज्यपाल कोश्यारींनी त्या वक्तव्याबाबत अखेर माफी मागितली, तुफान टीकेनंतर म्हणतात माझी...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 7:21 PM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagar Singh Koshyari) हे त्यांच्या तुफानी भाषणासाठी व्हायरल असतात. त्यांची अनेक वक्तव्य वादाची सापडल्याचेही आपण पाहिले आहे. अलिकडेच मुंबई बाबत त्यांनी केलेलं वक्तव्य हे चांगलंच वादात सापडलं होतं. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासहीत विरोधी पक्षांनी सडकून टीका केली होती. तर या राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असे मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) आणि भाजप यांच्याकडून सांगण्यात आले होते. तरीही राज्यपालांवरची टीका काही केल्या थांबत नव्हती. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असेही ते म्हणाले होते. मात्र आता राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी अखेर माफी मागितले आहे. त्यांचे मुंबईबद्दलचे वक्तव्य त्याने अखेर माघारी घेत महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो, असे विधान केले आहे. त्यांनी याबाबत एक प्रसिद्ध पत्रक काढलं आहे.

राज्यपालांचा माफीनामा जसाच्या तसा

प्रसिद्धीसाठी निवेदन

दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चूक झाली.

महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.

महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.

भगत सिंह कोश्यारी राज्यपाल, महाराष्ट्र

राज्यपाल नेमकं काय म्हणले होते?

मुंबई आणि आसपासच्या शहरातून गुजराती आणि राजस्थानी माणून बाहेर काढला तर मुंबईत पैसाच उरला नाही. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून पाहिलं जातं. मात्र हे लोक गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानीही उरणार नाही. असे वक्तव्य, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यानंतरचा हा वाद पेटला होता. त्यांच्या वक्तव्याला कुणीही समर्थन दिलं नव्हतं. गुजराती व्यापाऱ्यांनीही त्यांना विरोध केला होता.

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.