मायलेकींना आमदार बनवणारा महाराष्ट्रातील एकमेव मतदारसंघ

संपूर्ण राज्यात मायलेकींना आमदार म्हणून निवडून देण्याचा विक्रम हदगाव मतदारसंघात घडला होता. राज्यातील या दुर्मिळ घटनेची अद्याप तरी कुठेही पुनरावृत्ती झालेली नाही

मायलेकींना आमदार बनवणारा महाराष्ट्रातील एकमेव मतदारसंघ
Follow us
| Updated on: Sep 29, 2019 | 4:24 PM

नांदेड : राजकारणात बाप-लेक आमदार झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र नांदेडमध्ये मायलेकी आमदार झाल्याचं महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगांव (Hadgaon Vidhansabha Constituency Nanded) या मतदारसंघात हा दुर्मीळ योग घडून आला होता. मायलेकी आमदार होण्याची ही राज्यातील एकमेव घटना आहे.

नांदेड जिल्ह्यातील माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील जयवंतराव पाटील निजामाशी लढताना हुतात्मा झाले होते. तर त्यांचे आजोबा माधवराव पाटील 1951 साली हदगाव मतदारसंघातून निवडून आले होते.

त्यावेळी नांदेड हे निजाम स्टेटमध्ये सहभागी होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांनी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा पराभव केला होता. माधवराव पाटील यांचा वारसा पुढे अंजनाबाईनी पुढे नेला.

1957 साली निजाम स्टेटच्या दुसऱ्या निवडणुकीत अंजनाबाई हदगाव (Hadgaon Vidhansabha Constituency Nanded) मधून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी श्यामराव बोधनकर यांचा पराभव केला होता.

अंजनाबाईंनंतर त्यांची लेक सुर्यकांता पाटील यादेखील प्रदीर्घ कालावधीनंतर हदगाव मधूनच विधानसभेत पोहचल्या होत्या. पुढे याच सूर्यकांता पाटील हिंगोली लोकसभेतून देखील निवडणूक जिंकत केंद्रीय राज्यमंत्री बनल्या होत्या.

आदित्य ठाकरे महाराष्ट्रात कुठूनही लढू देत, मी रिंगणात उतरतो, राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचं चॅलेंज

संपूर्ण राज्यात मायलेकींना आमदार म्हणून निवडून देण्याचा विक्रम हदगाव मतदारसंघात घडला होता. राज्यातील या दुर्मिळ घटनेची अद्याप तरी कुठेही पुनरावृत्ती झालेली नाही. महिला सक्षमीकरणाच्या इतिहासात हा विक्रम एक सोनेरी किस्सा म्हणून नोंद आहे.

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.