AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घर फोडलं, माझ्या विरोधात पत्नीला उभं केलं, दिवाळी साजरी करायला कोणी उरलं नाही’, हर्षवर्धन जाधव यांचा दानवेंवर आरोप

संजना जाधव यांना शिवसेनेचे (शिंदे गट) कन्नड मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामागील कटकारस्थ्यात रावसाहेब दानवे यांचा हात असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. दरम्यान, कन्नडमध्ये विधानसभा निवडणुकीची त्रिकोणी लढत रंगली असून, जाधव दांपत्याचा हा कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष चर्चेचा विषय बनला आहे.

'घर फोडलं, माझ्या विरोधात पत्नीला उभं केलं, दिवाळी साजरी करायला कोणी उरलं नाही', हर्षवर्धन जाधव यांचा दानवेंवर आरोप
हर्षवर्धन जाधव यांचा दानवेंवर आरोप
| Updated on: Oct 31, 2024 | 8:01 PM
Share

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कारण हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव या निवडणूक लढवत आहेत. संजना जाधव यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून कन्नड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघात माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील निवडणूक लढवत आहेत. तसेच कन्नडचे सध्याचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत हे देखील निवडणुकीच्या रणांगणात आहेत. त्यामुळे कन्नडमध्ये तिरंगी लढत होत आहे. तीनही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पण असं असताना हर्षवर्धन जाधव यांनी संजना जाधव यांच्या उमेदवारीवरुन रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यात गेल्या काही वर्षांमध्ये कौटुंबिक कलहातून वितुष्ट आले आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नडमधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते 2009 मध्ये मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. तर 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाग घेतला होता. त्यांना 2 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव त्यांच्याचमुळे झाला होता. मतांचे विभाजन झाल्यामुळे खैरेंचा पराभव झाला होता. तर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता.

यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी नुकतंच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढवली होती. पण त्यांना केवळ 29 हजार मते मिळाली होती. यानंतर ते आता कन्नडमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. पण त्यांना आपल्या पत्नीचं कडवं आव्हान असणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत पती-पत्नी निवडणुकीच्या मैदानात आहेत. या राजकीय परिस्थितीवरुन हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हर्षवर्धन जाधव नेमकं काय म्हणाले?

“आमच्या कुटुंबातील एका सदस्याला फोडून एका राजकीय पक्षाने तिकीट दिलं आहे. कुठेतरी या सगळ्या गोंधळाच्या पाठीमागे भाजप नेते रावसाहेब दानवे आहेत. माझं घर फोडलं. माझ्या विरोधात साक्षात माझी पत्नी उभी करण्याचं काम झालं, याचा मी जाहीर निषेध करतो”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.

“दिवाळी दोन दिवसांवरती आलेली आहे. सर्वजण आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करत आहेत. माझ्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी कोणच उरलं नाही. मी आणि माझी आई दोघेचं उरलेलो आहोत. ठोकून काढू शेवटी धर्मयुद्ध आहे”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.