AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hasan Mushrif Ram Controversy : हसन मुश्रीफांचा जन्म राम नवमीला नाही तर…; समरजितसिंह घाटगेंचे गंभीर आरोप

कोल्हापूरः राज्याच्या ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंद करुन घेण्यात आला नाही. तिथीनुसार होण्याऱ्या वाढदिवसानिमित्त जाहिरात दिली गेली. त्यामध्ये हसन मधील ‘स’ चा ‘रा’ आणि मुश्रीफ मधील ‘म’ असा उल्लेख करुन तुम्ही मुश्रीफ नवमी (Ram Navami)करता, तुम्ही एवढे मोठे झाला का असा सवाल समरजितसिंह […]

Hasan Mushrif Ram Controversy : हसन मुश्रीफांचा जन्म राम नवमीला नाही तर...; समरजितसिंह घाटगेंचे गंभीर आरोप
हसन मुश्रीफ यांनी रामनवमीनिमित्त दिलेली जाहिरात वादातImage Credit source: TV9
| Updated on: Apr 15, 2022 | 7:06 PM
Share

कोल्हापूरः राज्याच्या ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंद करुन घेण्यात आला नाही. तिथीनुसार होण्याऱ्या वाढदिवसानिमित्त जाहिरात दिली गेली. त्यामध्ये हसन मधील ‘स’ चा ‘रा’ आणि मुश्रीफ मधील ‘म’ असा उल्लेख करुन तुम्ही मुश्रीफ नवमी (Ram Navami)करता, तुम्ही एवढे मोठे झाला का असा सवाल समरजितसिंह घाटगे (samarjeetsinh ghatge) यांनी केला. जयश्री राम यांचा उल्लेख हसन मुश्रीफ यांनी एकेरी केला आहे, त्याविरोधात आम्ही कागल पोलिसात गुन्हा नोंद करण्यासाठी आलेलो असतानाही पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेण्यास नकार देऊन यासंदर्भात पोलीस तपास करणार आहेत म्हणून सांगून त्यांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला आहे.

गेल्या चाळीस वर्षापासून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आपला जन्म रामनवमीला झाला असल्याचे सांगत आले आहेत. मात्र ते खोटे बोलत आहेत असा त्यांच्यावर आरोपही करण्यात आला आहे.

मुश्रीफ साहेब तुम्ही खोटं बोलत आहात

यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी त्यांच्या जन्मतारखेचा दाखल देत त्यांच्या जन्मावेळी म्हणजेच 24 मार्च 1954 ही त्यांची जन्मतारीख असली तरी त्यादिवशी रामनवमी नव्हती तर रंगपंचमी होती असं त्यांनी पंचागचा संदर्भ देऊन त्यांनी 11 एप्रिल 1954 या दिवशी रामनवमी होती हे त्यांनी पुराव्यानिशी पत्रकारांना सांगितले. तुमच्या जन्मानंतर 18 दिवसांनी रामनवमी आली आहे मात्र तुम्ही गेल्या 40 वर्षापासून खोटं बोलत असल्याचे सांगत आहात अशी टीकाही त्यांनी केली आहे.

रामभक्तांचा अपमान

समरजितसिंह घाटगे यांनी रामनवमी ऐवजी मुश्रीफनवमी अशी जाहिरात केल्याने रामभक्तांचा अपमान झाल्याचे सांगत पोलिसात तक्रार करण्यासाठी ते कागल पोलिसात गेले होते. मात्र पोलिसांनी तपास करुन गुन्हा नोंद केला जाईल असं त्यांना सांगण्यात आले.

हसन मुश्रीफांकडे सोन्याचा खंजीर

समरजितसिंह घाटगे यांनी आपले वडिल विक्रमसिंह घाटगे यांनी त्यांना राजकारणात आणूनही त्यांच्याविरोधात हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मुश्रीफ हे सोन्याचा खंजीर घेऊन जन्माला आले आहेत, आणि त्यांनी आमच्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीकाही त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस गुन्हा नोंद करुन घेत नाहीत तोपर्यंत मी येथून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या

Manisha Kayande: तर राज ठाकरे जामीन द्यायलाही पुढे येणार नाहीत, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांची खोचक टीका

Video : महाराष्ट्रात सेक्युलर विचारांचं सरकार हवं म्हणून मविआ अस्तित्वात आली- शरद पवार

Praveen Kalme : मला आजच कळतंय की माझ्याविरोधात FIR, मी आखाती देशात, सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे अवतरले

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.