MNS Leader Sandeep Deshpande : संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी, आज ठरणार भवितव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करत होते.

MNS Leader Sandeep Deshpande : संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी, आज ठरणार भवितव्य
संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 9:04 AM

मुंबई – मनसेकडून (MNS) राज्यात भोंग्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्यातील पोलिसांनी (Mumbai Police) मनसेच्या काही कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली तर काही नेत्यांची धरपकड सुरू केली होती. त्याचवेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी यांनी देखील पोलिस ताब्यात घेत होते, त्यावेळी दोघांनी तिथून पळ काढला. अचानक झालेल्या राड्यात एक महिला पोलिस जखमी झाली. घटनेच्या दिवसापासून ते फरार आहेत. तसेच मुंबई पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. चार मे रोजी राज ठाकरे यांच्या घराबाहेर ही घटना घडली होती. दोन्ही मनसे नेत्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. विशेष म्हणजे संदीप देशपांडे यांचा ड्रायव्हर 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

नेमकं काय झालं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करत होते. पोलिसांनी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पळून गेले. पोलिसांना धक्काबुक्की करताना एक महिला पोलीस जखमी झाली. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

महिला जखमी झाल्यापासून संदीप देशपांडे गायब आहेत

अटकपुर्व जामिनासाठी संदीप देशपांडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. महिला जखमी झाल्यापासून ते गायब आहेत. पोलिस त्यांचा विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतल्याची माहिती मिळाली आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची बैठक झाल्यानंतर ते मीडियाशी संवाद साधणार होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.

Non Stop LIVE Update
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.