भिवंडीत ‘स्ट्राँग रुम’बाहेर होमहवन

भिवंडी (ठाणे) : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चार टप्प्यातील मतदान संपल्या नंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग रुम येथील सुरक्षेबाबत काँग्रेस पक्षाकडून निरनिराळे आक्षेप घेतले जात असतानाच भिवंडी लोकसभा मतदार संघातील मतमोजणी ज्या ठिकाणी होत आहे, त्या भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील एलकुंदे  येथील प्रेसिडेन्सी शाळेच्या बाहेर बाजूस एका इनोव्हा कारमध्ये काही जण होमहवन करीत असल्याचे आढळून आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना […]

भिवंडीत 'स्ट्राँग रुम'बाहेर होमहवन
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:06 PM

भिवंडी (ठाणे) : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे चार टप्प्यातील मतदान संपल्या नंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग रुम येथील सुरक्षेबाबत काँग्रेस पक्षाकडून निरनिराळे आक्षेप घेतले जात असतानाच भिवंडी लोकसभा मतदार संघातील मतमोजणी ज्या ठिकाणी होत आहे, त्या भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील एलकुंदे  येथील प्रेसिडेन्सी शाळेच्या बाहेर बाजूस एका इनोव्हा कारमध्ये काही जण होमहवन करीत असल्याचे आढळून आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या कार मालकांना अडवत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान 29 एप्रिल रोजी पार पडल्यानंतर सहाही विधानसभा क्षेत्रातील मतदान ईव्हीएम यंत्र सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील एलकुंदे येथील प्रेसिडेन्सी स्कुल या ठिकाणी बनविण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या असून त्या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस, स्थानिक पोलीस असा तीन स्तरावरील जगता पहारा ठेवण्यात आला असून तेथील सीसीटीव्हीवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस उमेदवारांनी सुद्धा आपले कार्यकर्ते पहारेकरी म्हणून बसविले आहेत.

याच शाळेच्या गेटमध्ये असलेल्या दुसऱ्या इमारतीमध्ये शाळा व्यवस्थापनाचे कार्यालय असून त्या ठिकाणी जाण्यास कोणासही मज्जाव नसल्याने त्या ठिकाणी कोणीही जाऊ शकतो. तेथील शाळेचे चेअरमन महावीर जैन याना भेटण्यासाठी आलेले श्रीकांत पंदिरे आणि त्यांचे दोन साथीदार गेटमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी गेटपासून काही अंतरावर असलेल्या आपल्या इनोव्हा कार क्रमांक MH 04 EF 2315मध्ये बसून कार मध्येच होमहवनास सुरवात केली. याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यां कडून स्थानिक युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील याना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत त्यांच्या कार अडविल्या आणि कारची तपासणी केली असता कारच्या मागील बाजूस होमहवन सामुग्री आढळून आल्याने तेथील पोलिसांना बोलावून गोंधळ घालण्यास सुरवात केली.

त्यानंतर काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे हे सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्यांनी तुम्हाला होमहवन करण्यासाठी हीच जागा मिळाली का असा प्रश्न करीत त्यांना भंडावून सोडले . सदर कार मालक श्रीकांत पंदिरे यांनी आपण गोदाम खरेदीच्या चर्चेसाठी महावीर जैन यांच्याकडे आलो असता माघारी जाताना सूर्यास्ताची झाल्याने कार मध्येच होमहवन केले त्यामागे कोणताही दुसरा हेतू नसल्याचे सांगत विनवणी केली असता त्यांना सोडून देण्यात आले.

सदरच्या ठिकाणी स्ट्राँग रुम असताना त्या आवारातील संपूर्ण परिसर निवडणूक यंत्रणेने ताब्यात घेतला असताना शाळेच्या इमारतीसाठी वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित करीत, ज्यांना हरण्याची भीती असते तेच अशा प्रकाराने होमहवन जादूटोणा यांचा संहार घेतात असे सांगत पोलिसांनी सुद्धा याबाबत संपूर्ण परिसर लक्ष ठेवणे गरजेचे असून शाळेच्या कार्यालयात बसून आपले व्यावसायिक व्यवहार करण्याऱ्या इमारतीमध्ये सुद्धा कोणालाही जाण्यास पायबंद घातला पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.