AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना 15 दिवसांत भूखंड कसा दिला? लातूर MIDC प्रशासन अडचणीत येणार

जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना त्यांच्या नव्या कारखान्यासाठी 15 दिवसांत भूखंड उपलब्ध झाल्याचा आरोप झाला आहे.

जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना 15 दिवसांत भूखंड कसा दिला? लातूर MIDC प्रशासन अडचणीत येणार
| Updated on: Oct 19, 2022 | 5:01 PM
Share

लातुर : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia) यांचा एक कारखाना सुरु होण्याआधीच चर्चेत आला आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना त्यांच्या नव्या कारखान्यासाठी 15 दिवसांत भूखंड उपलब्ध झाल्याचा आरोप करत भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. भाजपने केलेल्या आरोपांमुळे लातूर MIDC प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी में.देश ऍग्रो प्रा.लि. नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांना कृषी प्रक्रियेचा कारखाना सुरु करायचा आहे.

हा कारखाना सुरु होण्याआधीच तो वादात सापडला आहे. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या में.देश ऍग्रो प्रा.लि. कंपनीला लातूर MIDC ने 15 दिवसात भूखंड उपलब्ध करून कसा दिला? असा सवालच मगे यांनी उपस्थित केला आहे.

MIDC मध्ये भूखंड मिळवण्यासाठी अनेक लोक वेटिंगलिस्टवर आहेत. आधीपासूनच यांनी अर्ज दिले आहेत. असे असताना रितेश देशमुख यांनाच तातडीने भूखंड उपलब्ध करुन दिल्याचा गुरुनाथ मगे यांनी केला आहे. जाहीर पत्रकार परिषद घेत मगे यांनी हे आरोप केले आहेत.

Follow Us
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान
शब्दाचा पक्का माणूस' विलिनीकरणाच्या चर्चेतच बच्चू कडूंचं मोठं विधान.