Sanjay Raut : बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही; राऊतांचे ट्विटवर ट्विट सुरूच

| Updated on: Jul 31, 2022 | 9:39 AM

कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत असल्याचे संजय राऊत (sanjay Raut) यांनी ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर म्हटले आहे.

Sanjay Raut : बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही; राऊतांचे ट्विटवर ट्विट सुरूच
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : संजय राऊत (sanjay Raut) यांच्या घरी चौकशीसाठी ईडीचे (ED) पथक दाखल झाले आहे, त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पत्राचाळ प्रकरणात राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता या सर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एकापाठोपाठ अनेक ट्विट (Tweet) केल्याचे पहायला मिळत आहेत. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. त्यामुळे मी  शिवसेनेसाठी लढत राहीन. असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान त्यांनी अन्य एका ट्विटमधून ईडी आणि भाजपावर देखील निशाणा साधला आहे. खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र असे संजय राऊत यांनी आपल्या दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटल आहे.

नेमंक काय म्हटलं संजय राऊत यांनी?

संजय राऊत यांनी ईडी करावाईच्या पार्श्वभूमीवर तीन ट्विट केले आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. तर त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमधून ईडी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.  खोटी कारवाई. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही, जय महाराष्ट्र अंस संजय राऊत यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. असे संजय राऊत हे आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा

नेमक प्रकरण काय?

संजय राऊत यांच्या घरी आज ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणात त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा तब्बल 1,034 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. आता या प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.