शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी, पण… : नारायण राणे

| Updated on: Oct 15, 2019 | 5:42 PM

"राजकीय वैऱ्यांशी असलेली कटुता जायला हवी असेल, तर दोन्ही बाजूने प्रयत्न (Narayan Rane On shivsena) हवेत. असे झाले तर माझी हरकत नाही," असे वक्तव्य राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केले.

शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी, पण... : नारायण राणे
Follow us on

सिंधुदुर्ग : “राजकीय वैऱ्यांशी असलेली कटुता जायला हवी असेल, तर दोन्ही बाजूने प्रयत्न हवेत. असे झाले तर माझी हरकत नाही,” असे वक्तव्य राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना (Narayan Rane On shivsena) केले. “राजकीय वैऱ्यांशी कटुता संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यानी पुढाकार घेतला तर माझी हरकत नाही.” असेही राणे यावेळी म्हणाले.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर टीका केली, तर आम्हीही त्यांना उत्तर देऊ. पण जर त्यांनी काहीही टीका केली नाही, तर काही प्रश्नच उद्भवत नाही. समोरचे काय कृती करतात त्यावर सर्व काही अवलंबून आहे. कृतीला कृतीने उत्तर दिलं जाईल.” असेही ते म्हणाले.

“नितेश राणे यांनी संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली आहे. त्याने नव्या पक्षातील नवी ध्येयधोरणे लवकरच आत्मसात करायला हवीत”, असेही नारायण राणे म्हणाले. “मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त काढला होता. तो आजचा दिवस होता. अनेक तारखा सूट होत नव्हत्या. त्यामुळे ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे आज तो दिवस अखेर उजाडला आणि मी भाजपात प्रवेश घेतला”, असे नारायण राणे भाजप प्रवेशाबाबत म्हणाले.

“भाजप प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. मला भाजपत सामावून घेतल्याबद्दल मी समाधानी आहे,” असे राणे यावेळी म्हणाले.

“ज्या लोकांनी भाजपत प्रवेश केला आहे. त्या सर्वांचे राजकीय पुनर्वसन होईल असा विश्वासही नारायण राणेंनी (Narayan Rane On shivsena) व्यक्त केला. माझ्याबद्दलची भूमिका भाजप नेत्यांना बोललो आहे. ते जसा आदेश देतील सुचवतील तसं मी करेन”, असेही ते म्हणाले.

“मंत्री मंडळात वर्णी लागण्याबाबत राणेंना विचारले असता, राणे म्हणाले. मंत्री मंडळात वर्णीबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांवर सोडला आहे. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्व वागलो. म्हणून कोणावरही टीका केली नाही.”

“मुख्यमंत्र्यांचे विश्लेषण 100 टक्के बरोबर आहे. नितेशला 80 टक्के मते मिळणार असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला. आज जे नितेश विरोधात उभे आहेत ते माझ्या बरोबरीचे नाहीत. ते आमदार, खासदार आहेत का? 50 वर्षे राजकारणात काढली आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी विरुद्ध उमेदवारांना विचारला.

“मी आदित्य ठाकरे यांना वरळीत निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचे अभिनंदन करतो. त्यांच्या उमेदवारीबद्दल मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. त्यापलीकडे मला काहीही म्हणायचे नाही.” असेही ते म्हणाले.

“या पुढची सर्व वाटचाल भाजपमध्ये असेल. मी भाजपच्या पलीकडे आता कुठलाही विचार करणार नाही. भाजप सोडून कोणताही आचार नाही विचार नाही. त्यामुळे यापुढे जे होईल ते भाजपात होईल. तसेच माझ्या राजकीय महत्त्वकांक्षेबद्दल मी आता काहीही सांगणार नाही”, असेही राणे यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या : 

संयमाने वागावे लागेल, मुख्यमंत्र्यांचा राणेंना सल्ला, तर प्रमोद जठारांना जाहीर आश्वासन

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावर टांगती तलवार, राणे गटात अस्वस्थता

नारायण राणे गांधी जयंतीच्या दिवशी मुलांसह भाजपात : सूत्र

राष्ट्रवादीला धक्के सुरुच, दोन आजी-माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश