राष्ट्रवादीला धक्के सुरुच, दोन आजी-माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार रामराव वडकुते (Ramrao Wadkute joins BJP) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे (Bapu Pathare joins BJP) यांनीही कमळ हाती घेतलं.

राष्ट्रवादीला धक्के सुरुच, दोन आजी-माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
Follow us
| Updated on: Oct 15, 2019 | 10:43 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेले धक्के, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच आहे. कारण आजी-माजी दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार रामराव वडकुते (Ramrao Wadkute joins BJP) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे (Bapu Pathare joins BJP) यांनीही कमळ हाती घेतलं.

रामराव वडकुते यांनी विधानपरिषदेचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला.

रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला मतदानापूर्वीच आणखी दोन धक्के बसले.

बापूसाहेब पठारे हे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. 2009 मध्ये ते राष्ट्रवादीकडून विधानसभेवर गेले होते.  वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्यासमोरील मोठा अडथळा आता दूर झाला आहे. मुळीक यांच्या उपस्थितीत बापूसाहेब पठारे यांनी मुख्यमंत्री निवास्थान वर्षा बंगला भाजपमध्ये प्रवेश केला.

संबंधित बातम्या 

ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का, आमदार रामराव वडकुते यांचा राजीनामा  

Non Stop LIVE Update
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.