ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का, आमदार रामराव वडकुते यांचा राजीनामा

राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार रामराव वडकुते यांनी आज (14 ऑक्टोबर) राजीनामा दिला (Ramrao Wadkute resign) आहे. रामराव वडकुते उद्या (15 ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का, आमदार रामराव वडकुते यांचा राजीनामा

हिंगोली : राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार रामराव वडकुते यांनी आज (14 ऑक्टोबर) राजीनामा दिला (Ramrao Wadkute resign) आहे. विधानपरिषद सभापतींकडे वडकुते यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला (Ramrao Wadkute resign) आहे. रामराव वडकुते उद्या (15 ऑक्टोबर) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली (Ramrao Wadkute resign) आहे.

रामराव वडकुते यांनी हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे वडकुते यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली होती. या भेटीचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. यानंतर ते लवकरच भाजपत जाणाार असल्याच्या चर्चा रंगल्या (Ramrao Wadkute resign) होत्या.

कोण आहेत रामराव वडकुते?

रामराव वडकुते हे विधानपरिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत

धनगर समाजाचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे

धनगर आरक्षणासाठी त्यांनीही आवाज उठवला आहे.

रामराव वडकुते यांनी अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषवलं आहे.

परभणी जिल्ह्यात धनगर प्रश्नांसाठी ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यानंतर ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले

माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर त्यांनी धनगर समाजाच्या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले.

2002 मध्ये  राष्ट्रवादीने वडकुते यांची महाराष्ट्र राज्य शेळी मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीच्या काळातच त्यांनी महामंडळास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वडकुते यांचे गाव आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हा हे कार्यक्षेत्र राहिलं.

2004 मध्ये वडकुते यांना राष्ट्रवादीने विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत वडकुते यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती.  मात्र, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव सातव यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने ही जागा स्वत;कडे घेतली.

त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI