Tukaram Munde: वेटरने बियर विचारली अन् संतापच आला, त्यानंतर… तुकाराम मुंढे यांनी सांगितला दिल्लीचा किस्सा

Tukaram Munde: तुकाराम मुंडे यांनी नुकताच विद्यार्थांशी संवाद साधताना युपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

Tukaram Munde: वेटरने बियर विचारली अन् संतापच आला, त्यानंतर... तुकाराम मुंढे यांनी सांगितला दिल्लीचा किस्सा
तुकाराम मुंढे
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 08, 2026 | 7:04 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) सुरू असलेल्या धाडींचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. यामध्ये सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक ठरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने हाती घेतलेल्या कार्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनालॉग पनीरवर बंदी टाकण्यापासून ते गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यापर्यंत एफडीएकडून होणाऱ्या प्रत्येक कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तुकाराम मुंढे यांनी युपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

नेमकं काय घडलं?

मुलाखतीमध्ये बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “त्यावेळी मला बीए झाल्यावर यूपीएसी करायचं होतं. जवाहर बुक स्टॉल फेमस होतं. सिव्हिल सर्व्हिसच्या पुस्तकांसाठी. त्यावेळी ते फेमस होतं. तेव्हा नेट वगैरे नव्हतं. भावाने सांगितलं जा आणि सर्व पुस्तके घेऊन ये. भावाचा उद्देश दोन तीन दिवस राहशील. क्लासेस पाहशील. ही घटना ९६-९७ची. तेव्हा पहिल्यांदा मी रेल्वेत बसलो. औरंगाबाद ते मनमाड आणि मनमाड ते दिल्ली असा प्रवास केला. मी त्या आधी रेल्वेत बसलो नव्हतो. बोगी नंबर कसा वाचायचा माहीत नव्हतं.”

रागात तेथून निघाले

पुढे ते म्हणाले की, “दिल्लीला पहाडगंजला गेलो. हॉटेलात गेला. वेटर आला. बिअर लावू क्या विचारलं. मला संताप आला. मी दारू पितो असं याला वाटतं का. मला दारूत काय प्रकार आहे माहीत नव्हतं. अजूनही माहीत नाही. मला राग आला होता. मी त्याला रागात विचारलं, क्या समजा है आपने. मुझे बिअर पुछतो हो. माझं त्या दिवशी हॉटेलचं बुकिंग होतं. दुसऱ्या दिवशी जेएनयूला जायचं होतं. पण रागाच्या भरात मी तिथून निघालो. आणि दिल्ली स्टेशनवर आलो. माझं तिकीट नव्हतं. केके एक्सप्रेस म्हणजे कर्नाटक एक्सप्रेसमध्ये बसलो. तिकीट मिळालं नाही. जनरल डब्यात टॉयलेट समोर भुसावळपर्यंत आलो. तिथून जळगावला आलो आणि तिथून औरंगाबादला आलो.”

मुलाखतीत पुढे ते म्हणाले की, “एक्साईज डिपार्टमध्ये त्यांचा रोल टॅक्स आणि लायसन्सचा आहे. माझा क्वॉलिटी आणि ब्रँडिंगबाबत आहे. त्यामुळे क्वॉलिटी प्रोडक्शन असेल त्यावर काम करण्याची गरज आहे. मीही त्याचा अभ्यास केला आहे. आपलं होटेल, पनीर आणि इतर गोष्टींवर काम सुरू आहे. फूड सेक्टरचं स्टँडर्ड हा एफडीएचा विषय आहे. आपल्याकडे आपण बाहेर खायला जातो. टेस्टी आणि स्पायसी खातो. आपल्याला फूड हॅबिट झाली आहे. ते आपल्याला नियंत्रणात आणलं पाहिजे. त्यामुळे लोक अधिक जी गोष्ट वापरतात त्यावर आम्ही फोकस केला. दूध, स्ट्रीट फूड, होटेलवर आम्ही फोकस केला आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us