शिवसेना बाजूला केल्यास आयुष्याची गोळाबेरीज करुन हिशोब लावा, सुषमा अंधारेंचे कदमांना काय आहे आव्हान..?

| Updated on: Sep 18, 2022 | 9:34 PM

रामदास कदम यांनी पक्षप्रमुखांवर टोकाची टीका केली आहे.उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, कदमांनी वापरलेले शब्द हे शिवसेनेला चांगलेच झोंबले आहेत.

शिवसेना बाजूला केल्यास आयुष्याची गोळाबेरीज करुन हिशोब लावा, सुषमा अंधारेंचे कदमांना काय आहे आव्हान..?
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे :  (Eknath Shinde) शिंदे गटाचे (Ramdas Kadam) रामदास कदम यांनी दापोलीच्या मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावह जहरी टीका केली आहे. पक्ष प्रमुखांच्या अस्तित्वापासून ते शिवसेनेच्या भवितव्याबाबत त्यांनी टोकाची विधाने केली असून आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेला करारा जवाब दिला आहे. मात्र, ज्यामुळे आपले राजकीय अस्तित्व निर्माण झाले त्यांनाच विसरण्याची पद्धत सध्या (Politics) राजकारणात सुरु झाली असल्याची टीका शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. खऱ्या अर्थाने रामदास कदम यांनी स्वत:च्या आयुष्यातून बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नावे जरी वजा केली तर कोणते पद मिळाले असते? याबाबत आत्मपरिक्षण करावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसंवाद यात्रेपासून सुरु झालेले आरोप-प्रत्यारोप आता दापोलीतील मेळाव्यापर्यंत कायम राहिले होते.

रामदास कदम यांनी पक्षप्रमुखांवर टोकाची टीका केली आहे.उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, कदमांनी वापरलेले शब्द हे शिवसेनेला चांगलेच झोंबले आहेत. मात्र, त्यांना उत्तर देण्यासाठी त्या पातळीवर जाणार नसल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

ज्या पक्ष नेतृत्वामुळे आपले राजकीय जीवन घडले त्यांच्यावर अशाप्रकारे टीका करणे ही आपली संस्कृती नाही. एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली राजकारण करायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच मुलाचा असा एकेरी उल्लेख हे अशोभनीय असल्याचेही अंधारे म्हणाल्या आहेत.

आज जे बोलत आहात ते कुणालबद्दल याचा थोडा विचार होणे गरजेचे आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नावे तुमच्या जीवनातून काढली तर एकातरी पदाच्या लायकीचे होतात का ? असा सवालच सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

स्वत: मागून घेतलेल्या गुहागर मतदारसंघात तुमचा पराभव झाला असताना विधानपरिषदेच्या माध्यमातून रामदास कदम यांचे पुनर्वसन केले होते. राजकीय भवितव्य घडवण्यासाठी शिवसेनेचे असलेल्या योगदानाचा तुम्हाला विसर पडला असल्याचे सुषमा अंधारे यांनी आठवण करुन दिली.

गेल्या पाच वर्षात मतदारसंघात केलेल्या 5 कामांचीच यादी काढा आणि जनतेसमोर जाऊन बोला. मेळाव्याच्या माध्यमातून गल्ली बोळातून बोलण्यापेक्षा एका खुल्या मैदनात या असे आव्हान अंधारे यांनी दिले आहे. तर आमने-सामने झाल्यावर सर्वकाही समोर येईल असा इशाराही त्यांनी कदमांना दिला आहे.