फायरब्रँड मंदा म्हात्रेंची सीधी बात, होय, स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!

| Updated on: Sep 04, 2021 | 11:50 AM

एका कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या, "राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावं लागतोय. आजही महिलांना राजकारणात काम करताना संघर्ष करावा लागतो.

फायरब्रँड मंदा म्हात्रेंची सीधी बात, होय, स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!
Manda Mhatre_Yashomati Thakur
Follow us on

नवी मुंबई : भाजप आमदार मंदाताई म्हात्रे (Manda Mhatre) यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं, अशी खंत मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. त्या नवी मुंबईत लोकमत (Lokmat) वृत्तपत्र समूहाच्या महिला सन्मान कार्यक्रमात बोलत होत्या. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यासमोरच मंदा म्हात्रे यांनी ही खंत बोलून दाखवली.

एका कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या, “राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांना डावलल जातं. दोनदा निवडून येऊनही मला आजही संघर्ष करावं लागतोय. आजही महिलांना राजकारणात काम करताना संघर्ष करावा लागतो.

एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केलं जातं. मला तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी लढणार, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

मंदा म्हात्रे नेमकं काय म्हणाल्या?

आपल्याच पक्षातील माणसं, जर एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली, तर मग त्याला भीती निर्माण होते, मग भीती निर्माण झाल्यावर फोटो टाकायचं नाही, कार्यक्रमाला बोलवायचं नाही, अशी जेव्हा भीती निर्माण होते, तेव्हा समजायचं आपलं कार्य चांगलं आहे. लक्षात घ्या महिलांनो. ज्यावेळी तुमचा फोटो टाकायचा असेल तेव्हा त्यांच्या मनात भीती निर्माण झाली तर समजायचं तुमच्या कार्याने धडकी निर्माण झाली आहे. काम करताना, कुठलीही भीती बाळगायची नाही, फळाची अपेक्षा बाळगायची नाही, आपण आपलं काम करत राहायचं, असं मंदा म्हात्रे म्हणाल्या.

VIDEO : भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजपला घरचा आहेर