मराठीत शपथ, भगवी सही, हेमंत गोडसेंचा मराठी बाणा, कोणत्या खासदाराची कुठल्या भाषेत शपथ?

सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून, तर उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

मराठीत शपथ, भगवी सही, हेमंत गोडसेंचा मराठी बाणा, कोणत्या खासदाराची कुठल्या भाषेत शपथ?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर नव्या सत्तेच्या काळातील संसदेचं पहिलं अधिवेशन सुरु झालं असून, पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर काहींनी हिंदी आणि संस्कृतमध्येही शपथग्रहण केलं. विशेष म्हणजे, शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मराठीतून शपथ घेतलीच. मात्र, त्याचसोबत, नोंदवहीत सही करताना सुद्धा खासदार हेमंत गोडसे यांनी मराठी बाणा दाखवत, गोडसेंनी भगव्या शाईच्या पेनाने सही केली.

औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी कोणत्या भाषेत खासदारकीची शपथ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, इम्तियाज जलील यांनी मराठी भाषेतून खासदारकीची शपथ घेतली. इम्तियाज जलील यांनी मराठीतून शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यांनी शपथग्रहण केल्यांतर टाळ्यांचा एकच कडकडाट ऐकू आला.

मी महाराष्ट्रात राहतो आणि मला मराठी भरपूर आवडते. त्यामुळे मी मराठी शपथ घेतली, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

शिवसेनेच्या सर्वच खासदारांनी मराठी भाषेतूनच शपथ घेतली, तर भाजपच्या बहुतांश खासदारांनी हिंदीतून शपथ घेतली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून, तर उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

कुठल्या खासदाराने कुठल्या भाषेत शपथ घेतली?

 • अरविंद सावंत (शिवसेना) – मराठी
 • संजय जाधव (शिवसेना) – मराठी
 • हेमंत गोडसे (शिवसेना) – मराठी
 • राजेंद्र गावित (शिवसेना) – मराठी
 • कपिल पाटील (भाजप) – मराठी
 • श्रीकांत शिंदे (शिवसेना) – मराठी
 • राजन विचारे (शिवसेना) – मराठी
 • भावना गवळी (शिवसेना) – मराठी
 • हेमंत पाटील (शिवसेना) – मराठी
 • गजानन कीर्तिकर(शिवसेना) – मराठी
 • प्रतापराव जाधव (शिवसेना) – मराठी
 • राहुल शेवाळे (शिवसेना) – मराठी
 • श्रीरंग बारणे (शिवसेना) – मराठी
 • सदाशिव लोखंडे (शिवसेना) – मराठी
 • पवनराजे निंबाळकर (शिवसेना) – मराठी
 • विनायक राऊत (शिवसेना) – मराठी
 • संजय मंडलिक (शिवसेना) – मराठी
 • धैर्यशील माने (शिवसेना) – मराठी
 • भारती पवार (भाजप) – मराठी
 • उन्मेश पाटील (भाजप) – संस्कृत
 • रामदास तडस (भाजप) – मराठी
 • गोपाळ शेट्टी (भाजप) – हिंदी
 • रक्षा खडसे (भाजप) – मराठी
 • सुभाष भामरे (भाजप) – मराठी
 • हिना गावित (भाजप) – हिंदी
 • प्रतापराव चिखलीकर (भाजप) – मराठी
 • सुनील मेंढे (भाजप) – संस्कृत
 • मनोज कोटक (भाजप)-  मराठी
 • पूनम महाजन (भाजप) – हिंदी
 • गिरीश बापट (भाजप) – संस्कृत
 • सुजय विखे पाटील (भाजप) – इंग्रजी
 • सुधाकर श्रुंगारे (भाजप) – हिंदी
 • सिद्धेश्वर महाराज (भाजप) – मराठी
 • रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) – मराठी
 • संजयकाका पाटील (भाजप) – मराठी
 • प्रीतम मुंडे (भाजप) – मराठी
 • सुरेश धानोरकर (काँग्रेस) – मराठी
 • उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) – इंग्रजी
 • सुनील तटकरे (राष्ट्रवादी) – मराठी
 • सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) – हिंदी
 • अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) – मराठी
 • नवनीत राणा (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष) – मराठी
 • इम्तियाज जलील (एमआयएम) – मराठी

Published On - 6:06 pm, Mon, 17 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI