Rajasthan Crisis: मुख्यमंत्री गहलोत समर्थकांवर आयकर छापे, दिल्ली ते राजस्थानपर्यंत धाडी

| Updated on: Jul 13, 2020 | 11:32 AM

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळच्या व्यक्तींवर आयकर छापे पडण्यास सुरुवात झाली आहे (Income Tax raid on CM Ashok Gehlot related people).

Rajasthan Crisis: मुख्यमंत्री गहलोत समर्थकांवर आयकर छापे, दिल्ली ते राजस्थानपर्यंत धाडी
Follow us on

नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जवळच्या उद्योगपतींवर आयकर विभागाचे छापे पडण्यास सुरुवात झाली आहे (Income Tax raid on CM Ashok Gehlot related people). आयकर विभागाचे 200 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकले. ही सर्व ठिकाणं अशोक गहलोत यांच्या निकटवर्तीयांची असल्याचं सांगितलं जात आहे.

अशोक गहलोत यांचे निकटवर्ती आणि ज्वेलरी फर्मचे मालक राजीव अरोरा यांच्या ठिकाणांवर आज (13 जुलै) सकाळी आयकर विभागाची पथक दाखल झाली. त्यांनी अरोरा यांच्या घरासह कार्यालयावर छापे टाकले. विशेष म्हणजे या छाप्यांची माहिती स्थानिय पोलिसांनाही देण्यात आली नव्हती. आयकर विभागाच्या पथकाने केंद्रीय राखीव पोलीस दलासोबत ही कारवाई केली.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

राजीव अरोरा यांच्या व्यतिरिक्त धर्मेंद्र राठोड यांच्या देखील घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली. धर्मेंद्र राठोड मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्ती मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांची चौकसी केली जात आहे. यात त्यांनी केलेल्या परदेशातील व्यवहारांची तपासणी केली जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राजीव अरोरा आणि धर्मेंद्र राठोड यांच्या जवळपास 24 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. या कारवाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. या कारवाईतून भाजप राजस्थानमधील काँग्रेसचे गहलोत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासोबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता करण्यात आलेल्या या कारवाईवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.

राजीव अरोरा यांच्याकडे राजस्थान काँग्रेसचं आर्थिक व्यवस्थापन

राजीव अरोरा हे राजस्थान काँग्रेसचे आर्थिक व्यवस्थापन करतात. त्यामुळे आयकर विभागाने त्यांच्या विविध ठिकाणांवर केलेल्या छापेमारीचे अनेक अर्थ निघत आहेत. यावरुन राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रसही भाजपवर सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसच्या या आरोपांचं खंडन केलं आहे. संबित पात्रा म्हणाले, “कोरोनामुळे आयकर विभागाची छापे टाकण्याची कारवाई थांबलेली होती. आता पुन्हा एकदा या कारवाईला सुरुवात झाली आहे. या छापेमारीचा आणि राजस्थानमधील राजकीय संकटाचा काहीही संबंध नाही.

हेही वाचा :

Sachin Pilot | काँग्रेसचा ‘पायलट’ भाजप एअरलाईन्सच्या वाटेवर, नड्डांच्या उपस्थितीत सचिन पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हं

Sachin Pilot | 26 व्या वर्षी खासदार ते केंद्रीय मंत्री, गहलोत सरकारला हादरे देणारे सचिन पायलट कोण आहेत?

Income Tax raid on CM Ashok Gehlot related people amid Rajasthan Crisis